कोकण

ःगुहागरनाका - विश्रामगृह रस्त्यासाठी ठिय्या आंदोलन

CD

-rat२४p२०.jpg-
२५N६६०४१
गुहागर ः गुहागरमध्ये ठिय्या आंदोलन करताना नागरिक.
----
गुहागरनाका-विश्रामगृह रस्त्यासाठी आंदोलन
पालकमंत्र्यांकडून कार्पेट मारण्याच्या सूचना ; नागरिक संतप्त, अपघाताचे वाढले धोके
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागरनाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मॉन्सूनपूर्व पाऊस संपताच दूरवस्था झालेल्या या रस्त्यावर कार्पेट मारून त्यांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यानी केल्या.
शहरातील नागरिकांना दुरवस्था झालेल्या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनसुद्धा दखल न घेतल्याने शहरातील संतप्त नागरिकांनी सकाळी जुने मच्छीमार्केट मार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर चिपळूण येथे जाऊन पालकमंत्री उदय सामंत व प्रांतधिकारी यांची भेट घेतली.
गुहागरनाका ते रेस्टहाऊस या महामार्गांच्या लांबीमध्ये पूर्णपणे खड्डे पडले असून, सदर खड्ड्यांमध्ये नागरिकांना त्रास होत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर खड्ड्यांमुळे किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. सर्व राजकीय पक्षातील नागरिकांनी पत्रव्यवहार केला आहे; परंतु पत्रव्यवहारव्यतिरिक्त ठोस कारवाई होत नाही. म्हणून अमरदीप परचुरे, नीलेश मोरे, दीपक परचुरे, शार्दूल भावे, हेमंत बारटक्के, मंदार पालशेतकर, ज्योती परचुरे, मंदार आठवले, अक्षय खरे, नितीन बेंडल, मनीष मोरे, विश्वास सोमण, मनीष खरे, अभिजित मर्दा, श्रीधर बागकर, उमेश भोसले, उदय आठवले, संतोष मावळणकर, प्रसाद बोले, केदार मालप, अमित मालप, अपर्णा आठवले, पराग मालप, संजय मालप, ज्योती परचुरे आदींसह अन्य ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांनी १५ मिनिटे राष्ट्रीय महामार्गवरील गुहागर-चिपळूण मार्ग रोखून धरला. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
---
सप्टेंबरपासून कामाला सुरुवात
या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थ चिपळूण येथे जाऊन पालकमंत्री उदय सामंत आणि प्रांतधिकारी यांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली. तसेच प्रांतधिकारी यांनी १५ ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि मोबदल्याचा विषय मार्गी लावू आणि सप्टेंबरपासून कामाला सुरुवात करू, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

Road Accident News : देवदर्शन करून परतताना काळाचा घाला! कारची लॉरीला जोराची धडक; एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT