कोकण

संगमेश्वर-आंबव पोंक्षे आरवली रस्ता खचला

CD

rat25p4.jpg-
66132
संगमेश्वरः आंबव पोंक्षे-आरवली रस्ता खचला असून मैलाचा दगडही त्यामुळे पडला आहे.
-----------
आंबव पोंक्षे-आरवली रस्ता खचला
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता ; ठेकेदाराचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ः तालुक्यातील तुरळ ते माखजन सरंद-आंबव पोंक्षेमार्गे आरवली असा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३ मधून रस्ता झाला. यामधील आंबव पोंक्षे ते आरवली रस्त्यावर रस्ता खचला आहे. याठिकाणी मैलाचा पुरलेला दगडही वाहून गेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या रस्त्याचे पहिल्याच पावसात तीनतेरा वाजले आहेत.
या रस्त्याला खरोखर ज्या ठिकाणी संरक्षण भिंत हवी होती, त्या ठिकाणी बांधलीच गेली नाही. परंतु अनावश्यक ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे, तिथे संरक्षण भिंत होणे गरजेचे होते. आंबव पोंक्षेचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सातत्याने मागणी केली होती. परंतु संरक्षण भिंत घातली गेली नसल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सांगितले.
आंबव पोंक्षे गावामध्ये रस्ता होऊन महिना होण्याआधीच या रस्त्याची दुर्दशा होत आहे. रस्त्याच्या कामावेळी अनेक ठिकाणी भातशेतीमधून चुकीची गटारे बांधण्यात आली. आवश्यक ठिकाणी गटारात पाईप टाकण्यात आलेले नाहीत. या साऱ्याच गोष्टींची केंद्र शासनाच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मजूर होण्यापूर्वी रस्त्यालगत असलेल्या जागा मालकांची कोणतीही ना हरकत घेण्यात आली नव्हती. रस्ता मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीने मध्यस्थी करून रस्ता रुंदीकरणास अनुकूल करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराने घेतली होती. पण सध्या अनेक कामे तशीच राहिल्याने या गोष्टीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्च करून झालेल्या या रस्त्याची तातडीने उच्चस्तरीय पाहणी आणि चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon politics: 'शेवगावातील मातब्बरांचा भाजपत प्रवेश'; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडी, राजळेंसोबत जाण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

CM Yogi Adityanath: सीएम योगींनी आदिवासी समाजाला दिली दिवाळी भेट, या घरी दिप प्रज्वलन करून साजरा केला सण

Solapur News: 'धोत्री येथे आढळला साडेसात फुटी अजगर'; नाग फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने पकडून अधिवासात केले मुक्त

Cyclone Alert India : पुढील तीन दिवस देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार, IMD कडून सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT