66142
ओरोसमध्ये ३१ला
पाटकरांची मुलाखत
ओरोस ः ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मेच्या मासिक कार्यक्रमात शनिवारी (ता.३१) मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक डॉ. रुपेश पाटकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. ‘लेखकाशी गप्पागोष्टी’ याअंतर्गत ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता मुलाखतीद्वारे गप्पा आणि प्रश्नोत्तरे असा हा कार्यक्रम असेल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा चौथा कार्यक्रम आहे. बदलती जीवनशैली, धावपळ, सवंग करमणूक, मोबाईलचे व्यसन, सामाजिक माध्यमांचा अतिरेकी वापर यामुळे मानसिक रोग, ताणतणाव यांचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुलेही तणावाला बळी पडत आहेत. यादृष्टीने हा वेगळ्या स्वरुपाचा कार्यक्रम आवर्जून पहावा, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.