कोकण

वीज वाहिन्यांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू

CD

तुटलेल्या वीज वाहिनीचा
धक्का लागून बैलाचा मृत्यू
मांगवलीतील घटना ः शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ ः मांगवली येथे तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसल्यामुळे बैलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २३) सकाळी घडला. खरीप हंगाम सुरू होण्याआधी मांडवकरवाडी येथील यशवंत भास्कर नाटेकर या शेतकऱ्याचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
श्री. नाटेकर यांनी बैल चरावयास सोडला होता. तो जवळच असलेल्या ढवळे यांच्या परड्यात गेला होता. हे कुटुंब कोल्हापूरला वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद असते. ढवळे यांच्या परड्यात विजेचा खांब असून तो पूर्णतः वाकलेल्या स्थितीत आहे. याकडे वीज वितरणने दुर्लक्ष केल्याने तो त्याच अवस्थेत आहे. तेथील वीज वाहिन्या तुटून पडल्यामुळे बैलाचा त्यांच्याशी संपर्क आल्याने बैल जागीच मृत्यूमुखी पडला. ही घटना सकाळी ढवळे यांच्या घराजवळून जाणाऱ्या ग्रामस्थाच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती नाटेकर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर सरपंच व पोलिसपाटील यांना कल्पना दिली. या घटनेची माहिती मिळताच वीज वितरणचे अधिकारी तसेच सरपंच शिवाजी नाटेकर, पशुवैद्यकीय अधिकारी पाटील, पोलिसपाटील कमलाकर लिंगायत यांनी घटनास्थळी जाऊ पंचनामा केला. ऐन शेती हंगाम सुरू होण्याआधीच त्यांच्यावर आपत्ती ओढवल्यामुळे वीज वितरण कंपनीने नाटेकर यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.


सुदैवानेच मनुष्यहानी टळली
मांगवली येथील विद्युतभारित तारांची कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने मनुष्यहानी टळली असली तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील गंजलेले व जीर्ण विजेचे खांब, जुन्या वीजवाहिन्या तातडीने बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT