कळसुलीतील
मोबाईल सेवा ठप्प
कणकवली ः कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले काही दिवस ठप्प असून नेटवर्क नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, हायस्कुल, पोस्ट या कार्यालयांना फटका बसत आहे. त्यामुळे सरपंच सचिन पारधिये यांच्यासह ग्रामस्थांनी कणकवली भूमंडळ अधिकारी कार्यालयात धडक देत कळसुलीतील दोन्ही टॉवर येत्या आठ दिवसांत सुरु करा; अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रीक, नंदकिशोर परब, चंद्रशेखर चव्हाण, मोहित सावंत, तुळशीदास परब, दत्तात्रय शिर्के, रमेश राणे, बळीराम राणे, प्रभाकर दळवी, सागर शिर्के, अक्षय मुरकर यांच्यासह कळसूली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कळसुली गावची लोकसंख्या साडे तीन हजाराच्या आसपास असून बीएसएनएलचे दोन्ही टॉवर वारंवार बंद होतात. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएलवर अवलंबून असणार्या ग्राहकांना याचा मोठा बसत आहे. तरी बीएसएनएल विभागाने तत्काळ उपाययोजना करून सेवा सुरळित करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रीक यांच्यासह ग्रामस्थांनी केली.
------
राजीव गांधी यांना
कणकवलीत वंदन
कणकवली : तालुका काँग्रेस कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न (कै.) राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिला अभिवादन करण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा पदाधिकारी अनिल डेगवेकर, प्रवीण वरुणकर, व्ही. के. सावंत, बाळू मेस्त्री, प्रदीपकुमार जाधव, आयेशा सय्यद, नीलेश मालंडकर, बाबा काझी, राजू वर्णे उपस्थित होते. राजीव गांधी हे नाव घेतलं, की एक तरुणदूरदृष्टी असलेला, आधुनिक विचारांचा नेता आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. राजीव गांधी यांनी देशाच्या राजकारणात एक नवा विचार आणि नवसंजीवनी दिली. देशात संगणकीकरण, दूरसंचार, आणि माहिती तंत्रज्ञानाचा पाया घालणारे ते पहिले पंतप्रधान होते. आज आपण मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल भारताबाबत बोलतो, त्याची मुहूर्तमेढ राजीव गांधींनीच रोवली होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही अनेक सुधारणा केल्या. नव्या पिढीला सक्षम करण्यासाठी त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण यावर भर दिला. पंचायतराज सशक्त करण्यासाठी त्यांनी ग्रामपातळीवर अधिकार देणारी व्यवस्था आणली, ज्यामुळे सामान्य माणसाला थेट निर्णय प्रक्रियेत भाग घेता आल्याचे उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
---
मसुरे येथे आज
पुण्यतिथी उत्सव
मसुरे ः मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथील श्री समर्थ बागवे महाराज मठ येथे उद्या (ता.२६) श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. या निमित्त सकाळी ८ ते १० वाजता पुजन, सकाळी ११ वाजता समर्थांच्या समाधीचे पूजन व अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ स्थानिक भजने, रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा स्थानिक व मुंबई कमिटी यानी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.