कोकण

रत्नागिरी-जिल्हा विशेष कारागृहाला लवकरच नवा साज

CD

rat२५p४३.jpg-
६६२०६
रत्नागिरी ः जिल्हा विशेष कारागृहाच्या दर्शनी भागाचे सुरू असलेल सुशोभीकरण.


जिल्हा विशेष कारागृहाला लवकरच नवा साज
पावणेसहा कोटी खर्च ; सुरक्षेच्यादृष्टीने बाह्य व अंतर्गत सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जिल्हा विशेष कारागृह हे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. या ऐतिहासिक कारागृहाच्या इमारतीचे मजबुतीकरण आणि नुतनीकरण सुरू आहे. सुमारे पावणेसहा कोटी खर्च करून या कामांद्वारे कारागृहाला नवा साज मिळणार आहे.
राज्य मंत्रीमंडळाने राज्यातील विविध कारागृहांमध्ये बांधकामांसाठी ५३.१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचाही समावेश होता. रत्नागिरी येथील विशेष कारागृहात आवश्यक बांधकामासाठीही या निधीचा विनियोग होणार आहे. सुमारे ५ कोटी ५२ लाख ७३ हजाराची निविदा काढली होती. त्यानुसार रत्नागिरी विशेष कारागृहाया नुतनीकरण आणि मजबुतीकरणाला प्रारंभ झाला आहे. मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरण सुरू आहे. त्यामध्ये स्ट्रक्चरल स्टील वर्क करणे, प्रिकोटेड शीट बसविणे, इमारतीच्या आवश्यक ठिकाणी जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर केले जाणार आहे.
स्वयंपाकगृह गोदाम, मनोरंजन-कलामंच, दवाखाना, वॉच टॉवर, जुने दरवाजे व खिडक्या काढून त्याठिकाणी नवीन बसविणे अशी कामे केली जाणार आहेत. या कारागृहाचे जुने छत काढून आता नव्याने प्रिकोटेड शीट बसविल्या जाणार आहेत. फोम सिलींग, आतील व बाहेरील रंगकाम, जलप्रतिबंधक उपाययोजना केल्या जाणार आहेत. कारागृह कार्यालयातील कारागृह अधीक्षक कार्यालयाचे नुतनीकरण, विविध शाखांचे नुतनीकरण केले जाणार आहे.

चौकट...
सावरकरांच्या कोठडीचेही नुतनीकरण
कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीचेही नुतनीकरण सुरू आहे. छायाचित्राच्या दालनाचे नुतनीकरण केले जाणार आहे. कोठडीची डागडुजी, सिलींग केले जाणार आहे. सावरकरांची कोठडी पर्यटकांसाठी चोवीस तास खुली ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी या कोठडीमध्ये जाण्या-येण्याचाही स्वतंत्र मार्ग बनविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT