swt२६६.jpg
66370
ओरोस ः येथे मंत्री भरत गोगावले यांची शिंदेगट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
देवगडातील प्रलंबित प्रश्नांकडे
वेधले मंत्री भरत गोगावलेंचे लक्ष
तालुकाप्रमुख साळसकरांचे निवेदन ः कार्यवाहीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः राज्याचे रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची येथील शिंदेगट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी ओरोस येथे भेट घेऊन तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. तळेरे (ता.कणकवली) येथे असलेले खारभूमी कार्यालय देवगडमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे यासह अन्य मागणी केली.
ओरोस येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस श्री. साळसकर यांनी उपस्थित राहून तालुक्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आग्रे, संजय पडते, मणचे सरपंच दीपक तोरस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. साळसकर यांनी मंत्री श्री. गोगावले यांना तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत अवगत केले. त्यातील काही प्रमुख मागण्यांमध्ये, तालुक्यात रोजगार हमी योजनेमधून घेण्यात आलेली २०१४-१५ पासूनची अर्धवट स्थितीत असलेले धुपप्रतिबंधक बंधारे कामे पूर्ण करण्यात यावीत, तळेरे येथे असणारे खारभूमी कार्यालय देवगडमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची धुपप्रतिबंध बंधारे कामे रोजगार हमी योजनेतून घेण्यात यावीत त्यासाठी विशेष बाब म्हणून शासन निर्णय काढावा जणेकरून शेतजमिनीची धूप थांबेल, अकुशल मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात यावी, मणचे तिर्लोट मधील धुपप्रतिबंधक बंधारे कामे खारभूमी विभागाकडून घेण्यात यावीत, विकासकामाला अडथळा येणारा कांदळवन प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा आदींचा समावेश होता. दरम्यान, श्री. गोगावले यांनी त्यांना सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती श्री. साळसकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.