rat२६p२०.jpg ः
२५N६६३४५
राजापूर ः मुचकुंदी नदीवरील गोळवशी-वडदहसोळ पूल
---
गोळवशी-वडदहसोळ पुलाचे लोकार्पण
ग्रामस्थांची स्वप्नपूर्ती ; मुचकुंदी परिसर विकास संघाच्या वर्धापनदिनाचे औचित्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः तालुक्यातील मुचकुंदी नदीवर बांधण्यात आलेल्या आणि लांजा व राजापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गोळवशी-वडदहसोळ पुलाचा लोकार्पण आज झाला. मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या सामाजिक संस्थेसह या परिसरातील गावांमधील ग्रामस्थांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या संस्थेच्या ८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात पुलाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
या पूल उभारणीमुळे पुलाच्या परिसरातील राजापूर आणि लांजा तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थांचा, शाळकरी मुलांचे दळणवळण आणि संपर्क अधिक सुलभ अन् सुरक्षित झाला आहे. मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या सामाजिक संस्थेच्या ८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून झालेल्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला वडदहसोळ गावप्रमुख उमाजी पळसमकर यांचे सुपुत्र अशोक पळसमकर, गंगाराम म्हादये, भानू गितये, नारायण म्हादये, वडदहसोळ सरपंच विजय घाडये, नारायण म्हादये, रूण सरपंच सुहास साखरकर, निवोशी-इंदवटी सरपंच विनोद गुरव, चुनाकोळवण सरपंच श्रीकांत मटकर, रावरी-बापेरे सरपंच गजानन बाणे, कोंड्ये सरपंच मनोज चंदूरकर, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूरचे अध्यक्ष सुभाष तांबे, माजी अध्यक्ष विजय भगते आदी मान्यवर उपस्थित होते.
राजापूर आणि लांजा तालुक्यांना जोडणाऱ्या मुचकुंदी नदीवर गोळवशी-वडदहसोळ पूल व्हावा, अशी गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरातील ग्रामस्थांची मागणी होती; मात्र, या मागणीची पूर्ती झालेली नाही. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या पुलाच्या उभारणीसाठी मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या संस्थेच्या माध्यमातून राजापूर-लांजा तालुक्याच्या पूल परिसरातील पंचक्रोशीतील गावांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि पुलाच्या कामाला मंजुरी मिळून पुलाची उभारणीही पूर्ण झाली. मुचकुंदी परिसर विकास संघ संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या पुलाचा लोकार्पण सोहळा झाला. त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्याबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करताना पूल उभारणीसाठी प्रयत्न करणार्या मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या संस्थेला विशेष धन्यवाद दिले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.