कोकण

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे निराधार मुलांसाठी ''''साथी मोहिम''''

CD

rat२६p४५.jpg-
२५N६६४३९
रत्नागिरी - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे निराधार मुलांसाठी साथी मोहिमेसाठी समिती स्थापनेच्यावेळी उपस्थित मान्यवर.
---
राष्ट्रीय विधी सेवातर्फे निराधार मुलांसाठी ‘साथी मोहीम’
विधी सेवा प्राधिकरणातर्फे समितीची स्थापना ; वेळापत्रकानुसार अमंलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई याच्या निर्देशानुसार निराधार मुलांना कायेदशीर ओळख प्रदान आणि सामाजिक कल्याण प्रवेश सुलभ करण्यासाठी १३ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत साथी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान केवळ मुलांची ओळख निर्माण न करता त्यांना शिक्षण, आरोग्य, निवारा, सामाजिक समावेश आणि कायदेशीर संरक्षणाच्यादृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या मोहिमेचे उद्दिष्ट हे निराधार मुलांना कायेदशीर ओळख प्रदान करण्यासाठी आणि सामाजिक कल्याण प्रवेश सुलभ करण्यासाठी आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे मोहिमेची यशस्वी अमंलबजावणी करण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या आदेशानुसार साथी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव हे अध्यक्ष तसेच समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. समितीच्या सदस्यामध्ये जिल्हा बालसरंक्षण अधिकारी रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसीलदार, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रत्नागिरी व पोलिस अधिकारी विशेष बाल पोलिसपथक प्रमुख, निरीक्षणगृह-बालगृहाचे अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांचे पॅनलवरील पॅनल विधीज्ञ तसेच कायदासाथी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
---
१५ ऑगस्टपर्यंत कालावधी
साथी समितीची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांचेकडील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे माणिकराव सातव यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT