कोकण

कोसळलेला साकव दुरूस्तीच्या तातडीने हालचाली

CD

‘त्या’ साकव दुरूस्तीच्या हालचाली
ब्राह्मणदेव मंदिराजवळील घटना; अधिकाऱ्यांकडून पहाणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राह्मणदेव मंदिराजवळील वहाळावर मोडकळीला आलेला लोखंडी साकव मुसळधार पावसामध्ये दोन दिवसांपूर्वी कोसळला आहे. याची तत्काळ दखल आमदार किरण सामंत यांनी घेत सदरचा साकव तत्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले आहेत. तहसीलदार विकास गंबरे यांनी देखील या घटनेची दखल घेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार सामंत यांच्या सूचनेप्रमाणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी भालचंद्र भालेकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत सदरचा साकव दुरूस्त करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राह्मणदेव मंदिराजवळील वहाळावरील साकवाची पुरती दूरवस्था झाली होती. गेली तीन वर्षे या साकवाची दुरूस्ती करावी, अशी मागणी करून व ग्रामपंचायतीने ठराव करूनही संबंधित विभागाने लक्ष दिले नव्हते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये हा साकव मोडून पडला. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. याची आमदार सामंत यांनी तातडीने दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सदरच्या साकवाची पाहणी करून दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दखल घेत पाहणी करत सदरचा साकव तातडीने दुरूस्त करून देण्याबाबत कार्यवाही हाती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army and USA: भारतीय सैन्याने ५४ वर्षांपूर्वीचा 'तो' पुरावा उघड करत, ट्रम्प यांना थेट आरसाच दाखवला!

Video : जन्मदाती रस्त्यावर मग वंशाचा दिवा कशाला हवा? रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी वृद्ध आई, काळीज पिळवटणारा व्हिडिओ पाहा

'ती त्याच्यासमोर पुर्णपणे विवस्त्र होती' राखी सावंतचा तनुश्री दत्तला टोमणा, म्हणाली...'हिला फक्त नाना पाटेकर...'

Latest Maharashtra News Updates Live : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

Satyapal Malik Networth: सत्यपाल मलिक यांच्याकडे किती मालमत्ता होती? डोक्यावर होतं कर्ज

SCROLL FOR NEXT