- rat२७p३.jpg-
P२५N६६५१९
राजापूर ः मांडवकरवाडी येथील बंधाऱ्याचा फित कापून उद्घाटन करताना शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत, अविनाश लाड आणि मान्यवर.
---
शासन मदतीशिवाय बांधला स्वप्नपूर्ती बंधारा
अपूर्वा सामंत ः कोदवली-मांडवकरवाडी ग्रामस्थांचे आदर्शवत काम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः तालुक्यातील कोदवली-मांडवकरवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडीच्या नेतृत्वाखाली शासनाच्या मदतीशिवाय स्वप्नपूर्ती बंधारा बांधत साऱ्यांसमोर ठेवलेला आदर्श कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या युवानेत्या अपूर्वा सामंत यांनी केले.
राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅपही त्यांनी ग्रामस्थांपुढे मांडला. या वेळी मांडवकरवाडीतील ग्रामस्थांनी बांधलेल्या स्वप्नपूर्ती बंधाऱ्यांचे शिवसेना युवानेत्या अपूर्वा सामंत, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, तहसीलदार विकास गंबरे आणि मान्यवरांच्या हस्ते झाला. तालुक्यातील कोदवली येथील ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडीच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी स्वतः गोळा केलेल्या लोकवर्गणीसह अनेक दाते, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. या वेळी व्यासपिठावर तहसीलदार विकास गंबरे, अॅड. यशवंत कावतकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, राजापूर संत निरंकारी मंडळाचे मुखी सिद्धेश शिंदे, सरपंच प्रणोती भोसले, माजी सरपंच विवेक मांडवकर, रमेश गोडांबे, विलास गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी अपूर्वा सामंत यांनी कोदवली मांडवकरवाडीला शाळा, रस्ते, पथदीपासह अन्य सर्व विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासह फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. या वेळी त्यांनी सऱ्यांना विकासाला साथ देण्याचे आवाहनही केले. माजी उपमहापौर लाड यांनी ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडी या मंडळाने विविध उपक्रम राबवताना गावविकासासाठी दिलेले प्राधान्य निश्चितच आदर्शवत असल्याचे सांगितले. अॅड. कावतकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून सिमेंट बंधाऱ्याला आर्थिक पाठबळ मिळाले असून, मांडवकरवाडीतील शाळा इमारत, रस्ते, पथदीप, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आदी कामेही मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी तहसीलदार गंबरे, प्रफुल्ल मांडवकर यांनी मनोगताद्वारे मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तत्पूर्वी, या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकाश मांडवकर यांनी तर सूत्रसंचालन विलास पळसमकर यांनी केले. सिमेंट बंधारा बांधकामासाठी ज्या ज्या लोकांसह सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.