rat२७p१.jpg-
२५N६६५१३
रत्नागिरी : दहावीत १०० टक्के गुण मिळवणारा वेदांग कुलापकर व पूर्वा माईणकर यांचा सत्कार करताना प्रांताधिकारी जीवन देसाई आणि संस्थाध्यक्ष नंदकुमार साळवी.
---
व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या
जीवन देसाई ः ‘पटवर्धन’मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी योग्य निर्णय घ्यावा. आपली आवड व क्षमता ओळखून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा. ज्ञान, कौशल्य व योग्य दृष्टिकोनामुळे यश मिळते, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले.
पटवर्धन हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. शाळेच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी होते. या वेळी उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, सदस्य विनायक हातखंबकर, मिलिंद कदम, संतोष कुष्टे, श्रीराम भावे, माजी उपमुख्याध्यापक वसंत आडर्ये आदी उपस्थित होते. घाटविलकर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती दिली. दहावीचा निकाल ९८.४७ टक्के लागला. ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. वेदांग कुलापकर व पूर्वा माईणकर यांनी १०० टक्के गुण मिळवून शाळेच्या गुणवत्तेची उंची वाढवली. त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वेदांग, पूर्वा आणि स्वरूपा नागवेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि संस्थेला दिले.
प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. द्वितीय क्रमांक श्रावणी नाईक हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. संस्कृत विषयात ५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यांनाही सन्मानित केले. अध्यक्षीय भाषणात साळवी यांनी शाळेच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव केला. बालवर्गापासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत संस्थेची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन शिक्षिका हेमलता गुरव आणि प्रतिभा बंडबे यांनी केले. सांस्कृतिक प्रमुख सुनीता गाडगीळ यांनी नियोजन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.