कोकण

-शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणार

CD

गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणार
‘गोपाळकृष्ण’चे माजी विद्यार्थी; स्नेहमेळाव्यास आले एकत्र
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ ः शाळेतील मस्ती, एकत्रित केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडास्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हे चित्र श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात पाहायला मिळाले. त्याचबरोबर शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचेही सर्वांनी निर्णय घेतला.
जवळपास १८ वर्षांनी म्हणजेच २०००-०१ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पहिला स्नेहमेळावा १२ मे २०१९ मध्ये झाला. त्यानंतर २०२३ आणि आता तिसरे २०२५ मध्ये पार पडले. रविवारी कोकणचे सुप्रसिद्ध मे खातू मसाले उद्योगसमुहाच्या वरवेली चिरेखाण येथील संकुलामध्ये आयोजित करण्यात आला होता.
सकाळी ९.३० वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वजण गुहागर हायस्कूलमध्ये दाखल झाले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी सर्वांना परिचय करून देण्यास सांगतिले. वरवेली येथे गेल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी गाणी सादर केली. या स्नेहमेळाव्यासाठी मुलींची कोणतीच मदत न घेता मुलांनीच सर्व जेवण बनवले. या वेळी श्रीदेवी खातू, धनश्री खरे, प्राजक्ता बारटक्के, अनिता निकम भाग्यश्री पेठे, पूनम शेटे, प्रज्ञा गडदे, हेमंत बारटक्के, अमित कामेरकर, प्रशांत रहाटे, अंकुश जाधव, शैलेश मोरे, प्रवीण साळवी, अनिकेत लाड, राहुल माळी, संदेश हुमणे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT