66565
आपत्ती काळात सतर्कता आवश्यक
तहसीलदार वीरसिंग वसावे ः कुडाळातील बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः पावसाळी हंगामात सतर्क राहा. गावागावांतून नागरिकांचे येणारे फोन उचलून समस्या जाणून घ्या, असे आदेश तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुडाळच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिले. येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता. २६) सायंकाळी ही बैठक झाली.
या बैठकीस उपस्थित सरपंच, पोलिसपाटील यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती विषयक अहवाल नादुरुस्त पूल, पाणी साचण्याची ठिकाणे, पडलेली झाडे, रस्त्यांना खड्डे, बॉक्सवेलच्या ठिकाणी साचणारे पाणी, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे नागरिकांच्या घरे व बागायतीमध्ये घुसणारे पाणी आदी अहवाल या कार्यालयाकडे सादर केले होते. त्यानुषंगाने चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. त्यावर येणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांवर तातडीने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. सर्व संबंधित कार्यालयांनी, पोलिसपाटील, सरपंच, मंडल अधिकारी, तलाठ्यांनी आपत्तीदरम्यान सतर्क राहणे गरजेचे आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन चालू ठेवणे आवश्यक आहे. आपत्तीवेळी संपर्क न झाल्याने नुकसान झाल्यास संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे सांगून याबाबतच्या तरतुदीचे वाचन करण्यात आले.
------
सर्व विभागांचा समन्वय हवा!
संभाव्य आपत्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत स्थलांतर करण्याबाबतच्या नोटिसा दिल्या आहेत. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे, या भावनेने सर्व विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी, असे सांगण्यात आल्याची माहिती तहसीलदार वसावे यांनी दिली. बैठकीला पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उपअभियंता धीरजकुमार पिसाळ, वन अधिकारी संदीप कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर तसेच विविध खात्यांचे विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.