कोकण

मालवणात सैन्य दलाच्या शौर्यास सलाम

CD

66571


मालवणात सैन्य दलाच्या शौर्यास सलाम

तिरंगा रॅलीस प्रतिसाद; ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ ः ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत आणि हाती तिरंगा फडकावत सोमवारी (ता. २६) शहरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचे कौतुक केले. तसेच दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याने या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी सोमवारी सकाळी मालवण शहरात भरड नाका ते मालवण बंदर जेटी अशी तिरंगा रॅली काढली. भारताचा व भारतीय सैन्याचा जयघोष करत बाजारपेठेतून निघालेल्या या रॅलीचे विसर्जन बंदर जेटी येथे झाले. यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना तसेच दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या रॅलीत अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, सहदेव साळगावकर, संदीप परब, पूजा करलकर, पूजा सरकारे, रोहिणी दिघे, तारका चव्हाण, अमिता न्हिवेकर, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, महेंद्र चव्हाण, विजय निकम, ललित चव्हाण, दादा वेंगुर्लेकर, संतोष लुडबे, मिलिंद झाड, श्रीराज बादेकर, केदार झाड, रत्नाकर कोळंबकर, संदीप बोडवे, दर्शन वेंगुर्लेकर, सूर्यकांत फणसेकर आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT