परशुराम मंदिरात
लाठीकाठी प्रशिक्षण
चिपळूण : परशुराम संस्थान श्री भार्गवराम परशुराम व भारतीय लाठी महासंघ, रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्री परशुराम मंदिरात मुलामुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ६ वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दापोली येथील सुरेंद्र साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना उत्तम लाठीकाठी व दांडपट्टा शिकवला. या प्रशिक्षणाला आलेल्या सर्व मुलांनी प्रात्यक्षिके करून दाखवली व सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी भारतीय लाठी महासंघ दापोलीचे प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांचा संस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थानचे विश्वस्त अभय सहस्रबुद्धे, व्यवस्थापक शंकर कानडे, प्रशिक्षक श्री. व सौ. सुरेंद्र शिंदे, अजित बाळ व अनय बाळ तसेच परशुराम माजी सरपंच मंजिरी जोशी, माजी सरपंच रश्मी जोशी आदी उपस्थित होते.
राजेश कांबळे
झाले उपनिरीक्षक
संगमेश्वर ः कडवई येथील राजेश कांबळे हे पोलिसदलात गेली अनेक वर्षे जबाबदारीने, तत्परतेने आणि कायद्याचे पालन करून विक्रोळी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. निष्कलंक, निःस्वार्थी आणि सेवाभावी प्रवृत्तीचे कांबळे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. कुटुंबाला अभिमान वाटावा असे कार्य केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
मागासवर्ग आयोगाचे
सदस्य जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) व ज्योतिराम चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते सोमवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे दाखल होतील. ३ जून रोजी सकाळी १० ते ११ वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष व सर्व प्रांताधिकारी यांच्यासमवेत वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जातसमुहाबाबत बैठक घेणार आहेत. त्या वेळी जातसमुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्यांवर सुनावणी घेतील. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजता वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जातसमुहाची जिल्ह्यात क्षेत्रपाहणी करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.