66597
देवगडच्या खाडी किनाऱ्यावर
पहिल्याच पावसात अस्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः तालुक्याच्या किनारी भागात झालेल्या दमदार पावसामुळे खाडीकिनारी केरकचरा वाहून आला आहे. खाडीकिनारचे रस्ते जलमय झाले असून पाण्याबरोबरच माती वाहून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे किनारी भागात अस्वच्छता पसरली आहे.
येथील किनारी भागात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मॉन्सूनचेही दमदार आगमन झाले. त्यामुळे खाडीकिनारचा परिसर जलमय झाला आहे. खाडीकिनारच्या रस्त्यावरून पाणी वाहत असते. उतारावरील भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे किनारी भागातील रस्त्यावर गाळ वाहून आला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात किनारी भाग अस्वच्छ भासत आहे. मासेमारी हंगाम थंडावला असला तरीही किनारी भागात मच्छीमारांची पावसाळी कामे सुरू असल्याने सतत वाहनांची वर्दळ असते. खाडीकिनारी भागातील काही रस्ते चिखलमय झाल्याने त्यातूनच वाट काढीत जावे लागत आहे. गेले काही दिवस किनारी भागाला पाऊस झोडपून काढत असल्याने शहराचा कचरा वाहून पाण्याबरोबर खाडीपात्रात येत असल्याने खाडी परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. सध्या किनारी भागात लगबग असल्याने यातूनच वाट काढत जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.