कोकण

''एकात्मिक फलोत्पादन योजनेसाठी अर्ज करा''

CD

‘एकात्मिक फलोत्पादन
योजनेसाठी अर्ज करा’
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत २०२५-२६ अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन व पणन सुविधा व प्रक्रियांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. राज्याच्या कृषी उत्पादनात फलोत्पादन पिकांचा महत्त्वाचा वाटा आहे. फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके, त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम, पणन सुविधा व प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. यामध्ये फार्म गेट पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, संकलन एकत्रीकरण केंद्र, पूर्व शीतकरण गृह, फिरते पूर्व-शीतकरण गृह, शीतखोली, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, पुसा झिरो एनर्जी कुल चेंबर, सोलर क्रॉप ड्रायर, एकात्मिक शीतसाखळी प्रकल्प, एकात्मिक पुरवठा साखळी प्रकल्प, अपनी मंडी, ग्रामीण बाजार, थेट बाजार, वातावरणी नियंत्रित रिटेल बाजार, विक्री दालन, स्थायी, फिरते विक्री केंद्र, सुधारित रिटेल रेफर व्हॅन रिटेल काऊंटरसह मूल्यवर्धनासाठी दुय्यम अन्न प्रक्रिया युनिट या घटकांकरिता लाभ दिला आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मरणोत्तर नेत्रदान
करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षिणता नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत २०२४-२५ मध्ये पाच व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केलेले आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांचा १ मे रोजी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नेत्रदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन नेत्रदान करण्याचे आवाहन पालकमंत्री राणे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. नेत्रदान हे दृष्टिहीनांच्या जीवनात दिवा लावण्यासारखे आहे. तुमचे डोळे दान केल्याने इतर कोणाला तुमच्या डोळ्यांद्वारे जग पाहण्याची संधी मिळते. आपले डोळे दान केल्याने अंध व्यक्तीला उज्ज्वल भविष्याची आशा मिळते, ज्यांची दृष्टी गेली आहे, त्यांना नेत्रदान ही दुसरी संधी देते. नेत्रदानाचा संकल्प फॉर्म आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याकडे भरून देऊन नेत्रदानाचा संकल्प करू शकता. अधिक माहितीसाठी नेत्रसमुपदेशक रोहन शारबिद्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT