सामाजिक सेवा करणाऱ्यांचा गौरव
मुचकुंदी परिसर विकास संघ ; वर्धापनदिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः लोकोपयोगी विकासकामे करणाऱ्या मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूरचा आठवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘सामाजिक सेवेचा वसा’ हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांना संस्थेतर्फे विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यामध्ये संस्थेचे सचिव अजय मांडवकर यांना मानाचा ‘एमपीव्हीसी भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष सुभाष तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष विजय भगते, अमोल पळसमकर, अजय मांडवकर, गणेश खानविलकर, रवींद्र मटकर, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शिलेदार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये विनीत म्हादये, बलराम तांबे, सुजय गितये, संदीप कांबळे, अमर गोरूले, शैलेश गुरव यांचा समावेश आहे. विशेष कामगिरी सहकार्यकरिता मनोहर भेरे, तुकाराम म्हादये, आनंद बावधनकर, गुलशन मुकादम, प्रकाश पळसमकर, संदीप जोगळे, सुनील कांबळी, किरण भालेकर, अजय भगते, युवराज गितये, दशरथ तांबे, अविनाश तांबे, विकास पळसमकर, भगवान तळेकर, सुनील मटकर, संदीप म्हादये, विश्वनाथ जोगळे, सुहास साखरकर, रवी गितये, सुरेश गितये, महेश मांडवकर, राजेंद्र पालये, विनोद चव्हाण, प्रशांत जोगळे, नित्यानंद घाडीगावकर, सुनील मिरजोळकर, ऐश्वर्या घाडये, संचिता खानविलकर, प्रकृती कांबळे, सलोनी कांबळे, सुजाता हातणकर-तांबे, ललिता तरल-आग्रे, मानसी गितये आदींना विशेष कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘एमपीव्हीसी भूषण’ या मानाच्या पुरस्काराने अजय मांडवकर यांना गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.