कोकण

जायंटस ग्रुपतर्फे रुग्ण साहित्य वाटप

CD

जायंटस ग्रुपतर्फे
साहित्य वाटप
रत्नागिरी ः जायंटस ग्रुप ऑफ रत्नागिरी या सेवाभावी संस्थेतर्फे नाटे, राजापूर येथील नवलादेवी भजन मंडळ यांना रुग्णसेवा साहित्य प्रदान केले. यामध्ये फाउलर बेडस, व्हील चेअर्स, वॉकर्स, स्टेचर, लेगस्टिक, कमोड चेअर्स, सलायन स्टॅण्डस्‌ आदींचा समावेश होता. नवलादेवी भजन मंडळ, नाटे यांच्या कार्यकर्त्यांमार्फत हे दिलेले साहित्य नाटे आणि पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना वापरण्यासाठी मोफत देण्यात येणार असून, दिलेल्या साहित्याचा उपयोग त्या परिसरातील ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष सुनील सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष महेश दामले आणि जायंटस वेल्फेअर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. रुग्णसेवा साहित्य प्रदान कार्यक्रमानिमित्त नवलादेवी भजन मंडळ, नाटे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून ३० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून उपक्रमाची सुरुवात केली. रुग्ण साहित्य प्रदान कार्यक्रमास जायंटसचे पदाधिकारी डॉ. मिलिंद सावंत, संजय पाटणकर, प्रवीण डोंगरे, दीपक देवल, विनय जोशी, लक्ष्मीकांत भुते, सुनील सहस्रबुद्धे आणि महेश दामले उपस्थित हेते. तसेच सेवाभारतीचे मंदार जोशी आणि राजेंद्र रेळेकर आणि नवलादेवी मंदिर नाटेचे ऋषी ठाकूर आणि सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा
खेर्डीत सत्कार
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी दत्तवाडी येथील दत्तवाडी मित्रमंडळातर्फे दहावी, बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दत्तवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गुजर, उपाध्यक्ष स्वप्नील कुंभार, सुरेश पवार, पांडुरंग अण्णा कुंभार, रमाकांत सावंत, माळी, नार्वेकर, गीतांजली सावंत, सुर्वे, दत्तप्रसाद चव्हाण, खरात, संजय जाधव, समीर कदम, सुमित कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनियमित वीज
पुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
साखरपा : गेल्या दोन रात्री साखरपा पंचक्रोशीत होत असलेल्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. साखरपा पंचक्रोशीतील मेढे, दाभोळे, कनकाडी आदी गावांमधून गेल्या दोन रात्री सातत्याने वीज जाण्याचा प्रकार घडत आहे. रविवारी रात्री काही वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. सोमवारी रात्री तर तब्बल सहा वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. एकदा हा पुरवठा खंडित झाल्यावर ठीक दहा ते पंधरा मिनिटांनी तो पूर्ववत होत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. या सगळ्याबाबत ग्रामस्थांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्युत पुरवठा नेमका रात्री दहा ते सकाळी सात याच वेळेत खंडित कसा होतो? प्रत्येक वेळी नेमका दहा ते पंधरा मिनिटांसाठीच खंडित कसा होतो, दिवसभरात कोणताही दोष कसा निर्माण होत नाही, असे प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

SCROLL FOR NEXT