कोकण

अधीक्षक अभियंतापदी सुनीलकुमार माने रुजू

CD

- rat२८p४.jpg-
P२५N६६७०५
सुनीलकुमार माने
---
महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी माने
रत्नागिरी, ता. २८ ः महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंतापदी सुनीलकुमार माने यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे यांची बदली नागपूर प्रादेशिक कार्यालयात झाल्याने रिक्त झालेल्या पदावर माने यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती झाली आहे.
माने हे १९९४ मध्ये तत्कालीन एमएसईबीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने त्यांनी सहाय्यक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता अशा विविध पदावर कोल्हापूर, कल्याण, रत्नागिरी, सातारा येथे आपली सेवा बजावली आहे. त्यांना वीजक्षेत्राचा प्रदीर्घ असा तीस वर्षाचा अनुभव आहे. कोल्हापूर शहर विभागात कार्यकारी अभियंता पदावर असताना वीजदेयके, वसुली, वीजहानी आदी विषयांवर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवले, १५ किलोमीटर खराब उच्चदाब वाहिनी बदलून अत्यंत कमी कालावधीत औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा सुरू केला. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनी भूमीगत करणे तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील धोकादायक रोहित्रे स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्याने तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. माने यांच्या नेतृत्वात कोल्हापूर शहर विभागात प्रस्तावित १०० इलेक्ट्रिक बस चार्जिंगच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात व ७५ टक्के कामाची पूर्तता करणारा राज्यातील एकमेव विभाग ठरला आहे. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
----
कोट
रत्नागिरी जिल्ह्यातील मुलभूत वीजयंत्रणा अधिक सक्षम करत वीजग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
- सुनीलकुमार माने, अधीक्षक अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT