rat28p6.jpg-
66707
रत्नागिरीः जयस्तंभ येथे डांबरीकरण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवताना पालिका कर्मचारी.
---------
शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे
खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा उपयोग; चिखलाला आमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे अनेक भागात केली आहेत. उन्हाळा गेला; पण काम झालेल्या अनेक भागातील काँक्रिटीकरणाच्या साईडपट्ट्यांची कामे तशीच ठेवली होती. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात त्या अपूर्ण साईडपट्ट्या वाळू आणि खडीने बुजवण्याचे काम सुरू आहे; मात्र ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण नाही त्या ठिकाणी पावसामुळे खड्डे पडले असून, हे खड्डे मुरुम टाकून भरण्यास सुरवात केली आहे.
रत्नागिरी शहराचे सुशोभीकरण व विकासाच्यादृष्टीने नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी रुपये खर्चून मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. ज्या भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम केले त्या रस्त्याच्या अनेक ठिकाणी बाजूपट्ट्या अद्यापही वर्ष झाले तरीही जशास तशा आहेत. त्यामुळे रस्त्यावर साईडपट्टीवर जाण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही शहरातील काँक्रिटीकरणाचे हे काम अजूनही अपूर्णच आहे.
रत्नागिरीच्या साळावीस्टॉप येथील प्रवेशद्वारापासून १७ डिसेंबर २०२३ ला काँक्रिटीकरणाला सुरवात झाली. एकाच बाजूने मारूती मंदिरपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा झाला. त्यानंतर नाचणे येथून येणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम सुरू झाले. मारूती मंदिरकडून मजगाव मार्गाचे चर्मालय नाक्यापर्यंत, अजूनही बसस्थानकाकडून माळनाक्यापर्यंत येणाऱ्या एका बाजूचे काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे. ज्या भागातील काँक्रिटीकरण करण्यात आले त्या मारूती मंदिर सर्कल ते बसस्थानकापर्यंत खाली जाणाऱ्या काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांची बाजूपट्टी अद्याप तशीच ठेवली होती.
मारूती मंदिर सर्कल, माळनाका, शासकीय विश्रामगृह, जयस्तंभ ते अगदी बसस्थानकापर्यंत वाहनचालक, पादचारी, नागरिकांना या खडी टाकलेल्या बाजूपट्टीवरून अडखळत प्रवास करावा लागत होता. माळनाक्यापासून खाली जेलनाका, जयस्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशी अवस्था होती. जयस्तंभ येथील सर्कलला डांबरीकरणाच्या रस्त्याला पावसामुळे मोठे खड्डे पडले. वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे पालिकेने बुधवारी (ता. २८) त्या खड्ड्यामध्ये मुरूम टाकण्याच्या कामाला सुरवात केली.
चौकट
मारूती मंदिर सर्कलला दरवर्षीप्रमाणे खड्डे
तसचे दरवर्षीप्रमाणे मारूती मंदिर येथील सर्कलमध्ये डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत; पण सध्यातरी ते किरकोळ दिसत आहेत. या सर्कलला खड्डे हे नित्याचे झाले होते. गतवर्षी झालेल्या डांबरीकरणामुळे ते कमी झाले; पण नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुन्हा तेथे खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.
चौकट
जगात भारी आमची रत्नागिरी....
पूर्वी शहरात डांबरीकरणाचे रस्ते होते. दरवर्षी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडायचे ते पालिका ते भरत असे; पण सध्या काँक्रिटचा रस्ता, डांबरी रस्ता आणि खड्ड्यांमध्ये चक्क डबर टाकून मातीचा रस्ता बनवण्याचे काम पालिका करत आहे. अशा प्रकारचे रस्ते जगात कुठेही नसतील, अशी थट्टा रत्नागिरीकर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.