कोकण

आपले सरकार केंद्रांतील प्रमाणपत्रांचे शुल्क वाढणार

CD

सेवाकेंद्रातील प्रमाणपत्रांचे शुल्क वाढणार

आर्थिक भूर्दंड ; सर्वसामान्यांमधून नाराजीचाही सूर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः ‘आपले सरकार’ सेवाकेंद्रांतून मिळणार्‍या विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आल्यामुळे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आता १२८ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होत असतानाच लागू झाल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भूर्दंड बसणार आहे.
यंदा घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत जात, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर, नॅशनालिटी, रहिवासी अशा विविध प्रमाणपत्रांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची सेवाकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामध्ये प्रमाणपत्रांच्या शुल्कात अचानक वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. यापूर्वी एका प्रमाणपत्रासाठी साधारण ३३.६० ते ५७.२० रुपये एवढे शुल्क होते. मात्र, २५ एप्रिलपासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या दरात मुद्रांक शुल्क, राज्य व केंद्रीय जीएसटी, सेतू सेवा शुल्क, महाआयटी शुल्क आणि सेवा केंद्रचालकाचे शुल्क यांचा समावेश आहे. महागाई, सेवाकेंद्रांची देखभाल, कर्मचारी मानधन, वीजबिल यामुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये विविध दाखल्यांचेही दर वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला असून, त्यातून सर्व प्रमाणपत्रांच्या शुल्कातील दरवाढीमुळे सर्वसामान्यांमधून नाराजीचाही सूर उमटत आहे.
-----
प्रमाणपत्रांचे जुने-नवीन दर (रुपयांत)
प्रमाणपत्र* जुने दर* नवीन दर
जात प्रमाणपत्र* ५७.२०* १२८
नॉन क्रिमिलेअर* ५७.२०* १२८
उत्पन्न दाखला* ३३.६०* ६९
रहिवाशी दाखला* ३३.६०* ६९
नॅशनालिटी* ३३.६०* ६९
एसईसी* ३.६०* ६९
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT