कोकण

रत्नागिरीःजिल्हा पोलिस दलातर्फे २५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

CD

rat30p24.jpg
67231
रत्नागिरी : जिल्हा पोलिसांच्या बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
---------
जिल्ह्यातील २५८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण ; पोलिस अधीक्षकांशी साधला संवाद, पसंती क्रमाला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सहायक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक तसेच पोलिस शिपाई या संवर्गातील एकूण २५८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. यामध्ये आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या १२ पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर आस्थापना मंडळ गठित केले होते. ज्याचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे होते. तसेच सदस्य म्हणून अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व प्रभारी पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) रत्नागिरीच्या राधिका फडके, सदस्य सचिव म्हणून प्रभारी कार्यालय अधीक्षक श्रद्धा तळेकर यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षकांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा पसंतीक्रम जाणून घेतला.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनावरील सहायक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या त्यांच्या समक्ष पारदर्शक तसेच समुपदेशनाद्वारे बदली करता दिलेल्या पसंती क्रमांकाचा प्रशासकीयदृष्ट्या विचार करून केल्या. यातील प्रशासकीय बदल्यांमध्ये सहायक पोलिस फौजदार - ३०, पोलिस हवालदार-७२, पोलिस नाईक-४, पोलिस शिपाई-११३, तर चालक संवर्गातील बदल्यांमध्ये पोलिस हवालदार-१५, पोलिस नाईक-१ , पोलिस शिपाई-११ आणि आंतरजिल्हा बदल्यांमध्ये पोलिस हवालदार-१, पोलिस नाईक-२ व पोलिस शिपाई-९ अशा बदल्या करण्यात आल्या.
---
बदलीच्या रुजू होण्याच्या हलचाली
बदली झालेल्या पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रूजू होण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आपल्या हातातील असलेली प्रलंबित कामे पूर्ण करून पद्‍भार मुक्त होण्याची लगबग पोलिस ठाण्यात पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर बदलीच्या ठिकाणी मुलांच्या शाळा, महाविद्यालयातील प्रवेशाचेही टेन्शन संबधित पोलिसांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT