IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

IPL 2026 Sacked Captains Prediction: आयपीएल २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील ७० सामने पूर्ण झाले आहेत. या ७० सामन्यांनंतर असे कोणते ४ कर्णधार आहेत, ज्यांची हकालपट्टी होऊ शकते, याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने भाष्य केले आहे.
IPL 2026 Sacked Captains Prediction

Aakash Chopra's IPL 2026 Sacked Captains Prediction 

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (IPL 2026) साखळी फेरीचे सर्व ७० सामने अखेर संपले. यानंतर आता प्लेऑफमध्ये पोहचणारे ४ संघही निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. बंगळुरू आणि गुजरात आता प्लेऑफमध्ये क्वालिफायर १ सामना खेळतील, तर हैदराबाद आणि राजस्थान एलिमिनेटर सामना खेळतील.

मात्र काही संघांची कामगिरी या हंगामात समाधानकारक झाली असली, तरी काही संघांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या माजी विजेत्यांकडून सर्वाधिक निराशा चाहत्यांची झाली, करण या दोन्ही संघांकडून नेहमीच मोठी अपेक्षा चाहत्यांना असते.

मात्र यंदा चेन्नई सुपर किंग्स ८ व्या, तर मुंबई इंडियन्स ९ व्या क्रमांकावर राहिले. याशिवाय लखनौ सुपर जायंट्सचीही कामगिरी अत्यंत सुमार राहिली. याचदरम्यान काही कर्णधारांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने अशा ४ संघांची नावं संगितली आहेत, जे पुढच्या वर्षीपर्यंत त्यांचे कर्णधार बदलू शकतात.

IPL 2026 Sacked Captains Prediction
IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com