- ratchl३१२.jpg-
२५N६७२८३
चिपळूण ः ज्योती तोरस्कर यांचा सत्कार करताना भाजपच्या पदाधिकारी.
---
सती प्रथा बंद करण्याचे श्रेय इंग्रजांनी घेतले
ज्योती तोरस्कर ः चिपळूणमध्ये ८५ महिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे आजच्या स्त्रीला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. त्या काळात स्त्रीला असणाऱ्या मर्यादा पाहता त्यांचे काम हे स्त्रीला विचार करण्यास भाग पाडणारे होते. खरंतर, सतीची दुर्दैवी प्रथा ही इंग्रजांनी बंद केलेली नसून ती अहिल्यादेवी होळकर यांनी बंद केली; परंतु सतीची दुर्दैवी प्रथा बंद करण्याचे श्रेय हे इंग्रज घेतात हे दुःख आहे, असे मत इतिहास संशोधक ज्योती तोरस्कर यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिपळुणातील महिला सन्मान पुरस्कार सोहळाप्रसंगी व्यक्त केले.
चिपळूणातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या हॉलमध्ये चिपळुणातील विविध क्षेत्रातील देदिप्यमान काम करणाऱ्या ८५ महिलांचा सत्कार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मसोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यानिमित्त व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, इतिहास संशोधक ज्योती तोरस्कर, जिल्हा महिलाध्यक्ष वर्षा ढेकणे, चित्रा चव्हाण, अमित केतकर, विनोद भुरण, शशिकांत मोदी, स्नेहा मेस्त्री, शीतल रानाडे उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविक शशिकांत मोदी यांनी केले तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटाबद्दल ढेकणे, चव्हाण, मेस्त्री, रानडे यांनी ३०० पेक्षा अधिक उपस्थित महिलांना माहिती दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष सावंत व मोरे यांनी भारतीय जनता पार्टीचे काम याचा धावता आढावा घेतला. उपाध्यक्ष रामदास राणे, विनोद म्हस्के, उदय घाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी अनिता राजेशिर्के, आशिष खातू, विजय चितळे, सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर, पूनम काजारी, संदीप भिसे, विनायक वरवडेकर, निनाद आवटे, रत्नदीप देवळेकर, उल्हास भोसले, प्रणय वाडकर, अभय चितळे, संदेश ओक, विनोद भोबस्कर, अभिजित सावर्डेकर, विमल लढ्ढा, नुपूर बाचीम, नुपुरा मुळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.