- ratchl३११.jpg-
P२५N६७२८४
चिपळूण ः गुहागर बायपास मार्गावर मुस्लिम समाजाच्या सभागृहासमोर उभारण्यात आलेली संरक्षक भिंत.
---
अधिकाऱ्यांनीदर्जेदार विकासकामे करावीत
शेखर निकम ः चिपळुणात सव्वा कोटींची संरक्षक भिंत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः अतिशय वेगळी कल्पकता, विशेष डिझाईन, देखणे काम आणि उत्तम दर्जा अतिशय कमी कालावधीत जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाने सव्वा कोटींची संरक्षक भिंत उभारली आहे. जिल्हा बांधकाम उपविभाग चिपळूणचे शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिलेली ही भिंत सरकारी यंत्रणेसमोर आदर्शवत आहे. याच पद्धतीने दर्जेदार विकासकामे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली पाहिजे, असे सांगत आमदार शेखर निकम यांनी या कामाचे कौतुक केले.
शहरातील बायपास मार्गावर लाईफकेअर रुग्णालयाच्या बाजूच्या डोंगरावर मुस्लिम समाजाचे अतिशय भव्य सभागृह उभारले जात आहे. बहुतांशी काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सभागृहाच्या सुरक्षतेसाठी आमदार निकम यांनी मूलभूत सोयीसुविधा योजनेतून सव्वा कोटी रुपयांचा निधी संरक्षक भिंतीसाठी दिला आहे. राज्यात प्रथमच या योजनेतून निधी मिळाला तो फक्त चिपळूणला. वर्दळीच्या ठिकाणी असलेली ही भिंत बारा मीटर उंच आणि ३२ मीटर लांबीची आहे. शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांनी उपअभियंता मेश्राम यांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्तम दर्जाचे काम करून घेतले आहे. एवढे मोठे काम प्रथमच जिल्हा परिषदेला मिळाले होते. शाखा अभियंता सरदेसाई यांनी आरसीसीचे खास वेगळे डिझाईन तयार केले. भिंत दिसताना सुरेख दिसली पाहिजे आणि तिचा दर्जाही उत्तम असला पाहिजे, याची काळजी घेत उत्तम काम उभे केले असून या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.