67356
शिक्षक आंदोलनावर पालकमंत्र्यांची नाराजी
प्रश्न सोडविण्यास सक्षम ः संचमान्यतेबाबत सकारात्मक निर्णय होईल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः शिक्षकांनी संचमान्यतेविरोधात पुकारलेल्या आंदोलनावर मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यास सक्षम असतानाही आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव देसाई आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री राणे यांची येथील विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘संचमान्यतेविरोधात आंदोलन छेडण्यात आले. हा प्रश्न मुख्यमंत्री आणि सरकार दरबारी पाठपुरावा करण्यास सक्षम असताना शिक्षकांनी आंदोलन छेडले आणि सरकारवर रोष व्यक्त केला. आता या प्रश्नावर माझी भेट का घेता? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेईल.’’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगाच आंदोलने आणि निदर्शने नकोत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. आपल्यापर्यंत अडचणी मांडल्यास त्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.