कोकण

कोकणातील पत्रकारांची कार्यशाळा

CD

rat31p12.jpg-
25N67341
रत्नागिरी- कोकण विभाग पत्रकार कार्यशाळेच्या उद्‍घाटन बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत. सोबत अन्य मान्यवर.
-------------


रत्नागिरीचा विकास पर्यटकांपर्यत पोहोचवा
पालकमंत्री उदय सामंत ः कोकणातील पत्रकारांची कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ३१ ः रत्नागिरीमध्ये गेल्या काही वर्षात मोठे विकासात्मक बदल झाले आहेत. हा विकास पाहून, कोकणातील पत्रकारांनी तो आपल्या लेखणीद्वारे सर्वत्र पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, कोकण विभाग माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे कोकणातच पत्रकारिता जन्माला आली. त्याचा वारसा पुढे चालत असताना पत्रकारांची कार्यशाळा या भूमीतच होते, याचा सार्थ अभिमान आहे. पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी सरकार म्हणून आम्ही सकारात्मक आहोत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम राजाश्रय उभा करणे हे आमचे काम आहे.
याप्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘एआय’चा समाजमाध्यमांवर मोठा प्रभाव पडला आहे. भविष्यात हे आपण रोखू शकत नाही; परंतु त्याचा योग्य आणि चांगला वापर करणे हे आपल्या हातात आहे. माणसाची हुबेहूब नक्कल करणारे जेनेटिक म्हणजे ‘एआय’ आहे.
सर्वांच्याच नजरा एआय या कृत्रिम बुद्धिमतेच्या तंत्रज्ञानाकडे लागले आहे. तंत्रज्ञानातील ही एक विलक्षण क्रांती आहे. सर्वच क्षेत्रामध्ये एआयचा कमी-जास्त प्रमाणात वापर होताना दिसत आहे. मानवी जीवन सोपे आणि अधिक कार्यक्षम बनवणे हे या तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. समाजमाध्यमांमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे. यामुळे प्रिंट मीडियाला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, काळाप्रमाणे नवे बदल आपण आत्मसात केले तर आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार आहोत असेही सिंह यांनी सांगितले. या वेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक हेमराज बागुल, उपसंचालक अर्जना शंभरकर, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह कोकणातील पत्रकार एकत्र आले होते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT