कोकण

तंबाखूला नकार; आरोग्यास होकार!

CD

67484


तंबाखूला नकार; आरोग्यास होकार!

तळेरेत अभियानास प्रतिसाद; मानवी साखळी, घोषणांमधून जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन येथे ३० व ३१ मे कालावधीत दोन दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेत व्यसनांपासून दूर राहण्याचा व समाजात आरोग्यदायी विचार रुजवण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा कार्यक्रम डॉ. अनिल नेरुरकर (अमेरिका) यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या प्रज्ञांगण तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ३१ मे या कालावधीत ‘अमली पदार्थ विरोधी महिना’ मोहीम राबवण्यात येत असल्याने या मार्गदर्शन सत्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
पंधरा वर्षांपासून डॉ. नेरुरकर यांच्या मार्गदर्शनातून श्रावणी व सतीश मदभावे हे दाम्पत्य जिल्ह्यात तंबाखू, व्यसनमुक्ती आणि कॅन्सर प्रतिबंधक चळवळीचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात जनजागृती, शाळा-विद्यार्थी संवाद, व्यसनमुक्त संकल्प अशा उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाचा वसा उचलला आहे. या कार्यक्रमातील मार्गदर्शन सत्राच्या पहिल्या दिवशी (ता. ३०) सतीश मदभावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वावलंबन, नीतिमूल्ये आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. श्रावणी मदभावे यांनी तंबाखूचा इतिहास, त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम, व्यसनामुळे होणारे कौटुंबिक आणि सामाजिक नुकसान यावर माहिती देत विद्यार्थिनींना ‘व्यसनी जोडीदार टाळा-सुरक्षित भवितव्य निवडा’ असा सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी (ता. ३१) जागतिक तंबाखू विरोधी दिनी नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना निर्व्यसनी व्हा, स्वावलंबी बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवा, या त्रिसूत्रीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी मदभावे यांनी केले. आभार सतीश मदभावे यांनी मानले. प्रा. प्रशांत हटकर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोशनी बागवे, स्मितेश पाष्टे, आशिष घाडी, आर्यन पांचाळ, यश खरात, सिद्धांत खांडेकर, साक्षी मेस्त्री, उपासना जाधव, श्रेया साळुंखे यांचे मोलाचे योगदान लाभले. श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक भान आणि ‘व्यसनमुक्त युवा-बलशाली भारत’ या संकल्पनेचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.
......................
मानवी साखळीतून परिसरात जागृती
या कार्यक्रमात ७० ते ८० विद्यार्थी उपस्थित होते. मानवी साखळी आणि तंबाखू विरोधी घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली. स्पर्शिका मदभावे, मेधांश मदभावे आणि स्वरुप परब या लहान मुलांनी व्यसनमुक्तीवर कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

Khelna Project Palod : खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काटेरी झुडपांचा विळखा; सिंचन व्यवस्थेला धोका, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

SCROLL FOR NEXT