67483
कुडाळ ‘पेन्शनर्स’च्या
अध्यक्षपदी कांबळी
कुडाळ ः पेन्शनर्स असोसिएशन कुडाळच्या अध्यक्षपदी शरद कांबळी यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मनोहर आंबेकर यांचे २४ एप्रिलला आकस्मिक निधन झाल्यामुळे अध्यक्षपद रिक्त होते. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांची निवड होईपर्यंत अध्यक्षांची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कार्यकारिणीची विशेष सभा संघटनेच्या कार्यालयात झाली. संघटनेची घटना व पोटनियमातील तरतुदीनुसार विद्यमान कार्याध्यक्ष कांबळी यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून भेच्छा दिल्या. या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सांगून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित सदस्यांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.