कोकण

सिंधुदुर्गात विद्युत सेवेचा बोजवारा

CD

सिंधुदुर्गात विद्युत सेवेचा बोजवारा

ग्राहक संघटनेची खंत ः अधीक्षक अभियंत्यांची आज भेट घेणार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसातील जिल्ह्यातील वीज ग्राहक विविध वीज समस्यांनी हैराण झाले आहेत. महावितरणच्या वीज सेवांचा पुरता बोजवारा उडाला आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व वीज ग्राहक उद्या (ता. २) दुपारी ३.३० वाजता कुडाळ अधीक्षक अभियंता कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

महावितरणचे जिल्हा अधीक्षक अभियंता साळुंखे यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंतापदी अभिमन्यू राख यांची नियुक्ती झाली. जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत साळुंखे यांना माहिती होती. मात्र, त्यांची बदली झाल्याने जिल्ह्यातील वीज समस्या नूतन अधीक्षकांच्या नजरेत आणून देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी त्यांची भेट घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे अंधारात चाचपडत आहे. जिल्ह्यात शून्य वीज चोरी, वीज थकबाकी अशा समस्या नसतानाही ग्राहकांना चार-चार दिवस अंधारात राहण्याची वेळ येते. सावंतवाडीसारख्या शहरात देखील ७८ तास वीजपुरवठा खंडित होता. आजही शहरात दिवसातून पाच ते दहावेळा तर तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. अशीच परिस्थिती दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आदी तालुक्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीज समस्या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांच्या नजरेत आणून देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच जिल्ह्यातील वीज समस्यांनी प्रभावित असलेल्या ग्राहकांनी, गावागावांतील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी आपापल्या गावातील वीज समस्या लेखी स्वरुपात आणाव्यात.
---------
‘समस्यांची यादी घेऊन या’
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ज्या गावात नवीन सबस्टेशन, फिडर, रोहित्रे, वीज खांब, वायर, केबल, रेग्युलर जुन्या पद्धतीचे मीटर तसेच भूमिगत वाहिनी आवश्यक असल्यास त्याची सविस्तर यादी घेऊन कुडाळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT