आपत्ती निवारणासाठी
खेड पालिकेची ४ पथके
महादेव रोडगे; डेंग्यू साथीबाबत खबरदारी घ्या
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १ : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी खेड पालिका सज्ज झाली आहे. आपत्ती निवारणासाठी प्रशिक्षित नागरिकांसह कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चार पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांना होडी, लाईफ जॅकेट, दोरी बंडल आदी साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी आपत्ती निवारण बैठकीत दिली.
खेड नगरपालिकेत झालेल्या बैठकित त्यांनी हि माहिती दिली. खेड शहरातील नालेसफाई, मान्सून कालावधीत पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पूरग्रस्त भागातील उपाययोजना, संभाव्य साथरोग नियोजन, आपत्ती परिस्थितीत नागरिकांसाठी निवारा केंद्र, रस्ते दुरुस्ती, पूर परिस्थिती काळात , बचावकार्य, उपलब्ध साहित्यांचा तपशील, आपत्ती काळात अधिकाधिक कर्मचाऱ्यांना दिलेल्या जबाबदारीबाबत मुख्याधिकारी रोडगे यांनी उपस्थितांना सांगितले. संकट मोचन, बल शक्ती संस्थेच्यावतीने शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचे आपती प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी डेंग्यू साथीबाबत खबरदारी घेवून उपाययोजना करावी अशी सूचना केली. नालेसफाईची कामे राहिली असल्यास त्वरित करून पाण्याचा निचरा योग्य तऱ्हेने करा असेही सांगितले. तसेच अनिल सदरे, अनुज जोशी यांनीही यावेळी मते मांडली. विसर्जन कट्टाचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी आपत्ती काळात नागरिकांना प्रशिक्षणाचा चांगला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे व्ही. एम. माळी, महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव मोडक, आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के, पाटबंधारेचे हेमंत ढवळ, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, सत्यजित गोसावी, दीपेंद्र जाधव, संजय जाधव, सुधीर देवळेकर, विक्रांत पाटील, उत्तमकुमार जैन, मिलिद शिंदे, विजय जैन, सुरज निकम, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.