-rat2p11.jpg-
25N67629
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनमध्ये सहभागी बालदोस्त.
----
जागतिक सायकल दिन विशेष---- लोगो
जिल्ह्यामधील सायकल चळवळीला सुगीचे दिवस
चार क्लब सक्रिय; आबालवृद्धांसह महिलांचाही सहभाग
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : जिल्ह्याचा विचार करता वळणावळणांचे व चढ-उताराचे रस्ते यामुळे सायकल चालवणे आव्हानात्मक आहे; परंतु गिअरच्या अद्ययावत सायकलमुळे गेल्या पाच ते सहा वर्षांत सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शाळेत जाण्याकरिता विद्यार्थी सायकलचा वापर करतातच. आता तर सायकलच्या स्पर्धा, सायकल रॅली, बीआरएम, सायकलद्वारे पर्यटन करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे.
जागतिक सायकलदिनानिमित्त आढावा घेतला असता जिल्ह्यातील खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी येथील सायकल क्लबमुळे सायकलिंगला प्रोत्साहन मिळत आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने २०१८ मध्ये सायकल दिनाची घोषणा केली. तेव्हापासून जगभरात हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. चिपळूण नगरपालिका दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ‘सायकल दिवस’ साजरा करते, ज्यात लोकांना कामासाठी किंवा इतर कामांसाठी सायकलने प्रवास करण्याचा आग्रह केला जातो.
२०२० मध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांनी व्यायामासाठी सायकलिंगला सुरुवात केली. पूर्वीची घोडा सायकल आजही प्रसिद्ध असली तरी गिअरच्या बारीक टायर्सच्या आणि रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सायकल्स आता रस्त्यारस्त्यावर दिसू लागल्या आहेत. जिल्ह्यात प्रतिवर्षी सायकल संमेलनांचे एकत्रित आयोजन केले जात असून या द्वारे सायकलिंगविषयक नवनवे आयाम लोकांपर्यंत पोहोचत आहेत. दापोली सायकलिंग क्लब दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करत आहे तसेच आनंद, आरोग्य, पर्यावरण, मैत्री या चतुःसुत्रीवर खेड क्लब काम करत आहे. स्पर्धा, उपक्रमांतून चिपळूण क्लबही चांगल्याप्रकारे सायकलिंगचा प्रसार करत आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने २०२१ पासून आतापर्यंत अनेक सायकल रॅलीचे आयोजन केले. शालेय सायकल स्पर्धा, किड्स सायक्लोथॉन, समर, विंटर सायक्लोथॉन यांसह नामांकित सायकलपटूंची किंग ऑफ कुंभार्ली, रोलर कोस्टर सायक्लोथॉन या स्पर्धा जिल्ह्यात होत आहेत. सह्याद्री रॅंडोनिअर्स क्लबमुळे बीआरएम हा सायकलचा नवा आयाम जिल्ह्यात सुरू झाला.
---
सायकल चालवण्याचे फायदे ः
दररोज सुमारे ३० ते ४५ मिनिटे सायकल चालवा.
पर्यावरणाचे रक्षण होते, प्रदूषण होत नाही.
चरबी लवकर कमी होते व शरीर तंदुरुस्त राहते.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, मेंदू अधिक सक्रिय राहतो.
सायकल हे सर्वांत स्वस्त वाहन आहे.
---
सायक्लोथॉनला प्रतिसाद
सुवर्णसूर्य फाउंडेशनने हेदवी ते गणपतीपुळे (डेली स्टे फीट), रत्नागिरी ते देवूड (पेडल फॉर पेट्रोग्लिफ) आणि संगमेश्वर ते देवळे (पेडल फॉर स्पिरिच्युअॅलिटी) अशा तीन सायक्लोथॉनचे आयोजन केले. रत्नागिरीतील डॉ. नीलेश व डॉ. तोरल शिंदे यांनी वीरश्री ट्रस्टच्या माध्यमातून मुलांसाठी प्रदूषणमुक्त रत्नागिरीसाठी सायक्लोथॉनचे यशस्वीरित्या आयोजन केले.
--
कोट
आरोग्याच्या बाबतीत लोक जागरूक होऊ लागले आहेत. कामाचा ताण, वाढते वजन आणि स्थूलपणा, ब्लडप्रेशर, डायबेटिस अशा विविध आजारांनी त्रस्त असणारे अनेकजण वैद्यकीय सल्ल्याने सायकलिंग करू लागले आहेत. सायकलदिनानिमित्त सायकलिंगचे फायदे अधोरेखित करत आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये सायकल अविभाज्य भाग झाली आहे.
-डॉ. नितीन सनगर, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.