कोकण

भ्रष्टाचारासाठी ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्या

CD

swt29.jpg
67699
वैभव नाईक

भ्रष्टाचारासाठी ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्या
वैभव नाईकः सत्ताधाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ः ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीतून जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत, असा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी आज केला आहे.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ४३२ ग्रापंचायती असून त्यासाठी केवळ ३१७ ग्रामसेवक कार्यरत आहेत तर ११५ ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला असून परिणामी ग्रामपंचायतींचा कारभार धीम्या गतीने सुरु आहे. विविध योजनांची कार्यवाही ठप्प आहे. असे असताना जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे आर्थिक देवाण घेवाणीतून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना जिल्ह्याबाहेर बदली मिळवून देत आहेत. पहिल्या टप्प्यात १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि पुढील टप्प्यात २५ ग्रामसेवकांना आंतरजिल्हा बदली मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ग्रामसेवकांची आधीच कमतरता असताना कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांना आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर सोडले जात आहे. त्यामुळे दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार एका ग्रामसेवकावर येत असून गावाचे विकास आराखडे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच व सदस्यांना अडथळा ठरत आहे. व्यक्तिशः लाभाच्या योजना देखील ठप्प आहेत. ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे ग्रामपंचायतीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. ग्रामसेवक नसल्याने योग्य माहिती अभावी सरपंच चुकीच्या पद्धतीने कारभार हाताळत असून त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाया होत आहेत. त्यासाठी ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणे गरजेचे असताना मात्र सत्ताधारी लोप्रतिनिधी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडून पैसे घेऊन त्यांना हवे त्याठिकाणी बदली मिळवून देत आहेत आणि त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांना साथ देत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तेजश्रीसोबत नवऱ्याला रोमान्स करताना पाहून काय म्हणाली सुबोधची पत्नी? दिली भन्नाट प्रतिक्रिया, म्हणते- अगं तू...

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT