swt28.jpg
67686
परशुराम उपरकर
खासदार राणेंकडून बैठकींचे सोपस्कार
परशुराम उपरकर ः मतदारसंघातील नुकसानीची पाहणीही नाही
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ ः मॉन्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. खासदार म्हणून नारायण राणे यांनी केवळ बैठकीचे सोपस्कार केले. ज्यांचे नुकसान झाले त्यांची पाहणीही केली नाही, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. येथील श्री. उपरकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार राणे यांना जिल्ह्यात येण्याचे आवाहन करून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर श्री. राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ बैठकीचे सोपस्कार त्यांनी केले. जी बैठक घेतली त्या बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित नव्हते.
आज महामार्गाची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. श्री. राणे यांच्या गावाकडे जाणारा आचरा रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे आचरा दशक्रोशीकडे जाणाऱ्या नागरिकांना एसटीचे दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या या राज्य मार्गावरून होणारी वाहतूक ही चार किलोमीटर अंतर फिरून कणकवलीत येते. त्यामुळे हा भुर्दंड सर्वसामान्य एसटी प्रवाशांना बसत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित नसल्याचे समजते.
या मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. याची खासदार राणे यांनी पाहणी करणे गरजेचे होते. परंतु, केवळ त्यावर त्यांनी बैठकीचे आयोजन केले. प्रत्यक्षात त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे राणे प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर केवळ निवडणुकीपुरते जनतेपर्यंत जातात. जनतेच्या व्यथा त्यांचे झालेले नुकसान याकडे ते सातत्याने दुर्लक्ष करतात. हे चित्र जिल्ह्यातील जनतेने पाहिले आहे.’
चौकट
‘लाडक्या बहिणीं’मुळे तिजोरीत खडखडाट
गतवर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत शासनाने केवळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. परंतु, निधी नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून, लाडक्या बहिणींकडे लक्ष देत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही, अशी स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.