-rat५p९.jpg-
२५N६८२५४
चिपळूण ः निवळी येथे लोकवर्गणीतून उभी राहिलेली देवराई.
---
वर्गणी काढून निवळीमध्ये उभी राहतेय देवराई
तीन एकर जागेत उपक्रम; १२०० झाडांची रूजवात, एक वर्ष पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करून तालुक्यातील निवळी येथे एक वृक्षप्रेमी श्री पावणाईदेवी मंदिर (बाराआणे) देवस्थानच्या तीन एकर जागेमध्ये देवराई निर्माण करत आहे. गेली दोन वर्षे त्यांची मेहनत सुरू असून, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व वृक्षप्रेमी गुलाब सुर्वे स्वतः मेहनत करून ही देवस्थानची देवराई निर्माण करत आहेत.
आज देवराया नव्याने निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. हे लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून निवळी येथील सुर्वे यांनी गावात पुरातन देवराई नव्याने निर्माण करण्याचा जणू ध्यास घेतला आहे. त्यासाठी सुरुवातीला निवळी बाराआणे ग्रामस्थांची बैठक ग्रामदेवतेच्या मंदिरात घेण्यात आली. देवस्थानच्या जमिनीमध्ये देवराई निर्माण करण्यासाठी सुर्वे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आणि येथील लोक तयारदेखील झाले. आम्ही झाडे जगवू, असा त्यांनी निर्धार केला. त्याचवेळी शाहनवाज शाह यांनी सामाजिक वनीकरण व नाम फाउंडेशनच्या वनसंजीवन योजनेच्या माध्यमातून निवळी येथील देवराई उभारण्यासाठी नियोजन केले. या ठिकाणी पुणे येथून वेगवेगळ्या प्रकारची १ हजार २०० झाडे आणण्यात आली. येथील निसर्गात वाढणारी, दुर्मिळ झालेली झाडे गतवर्षी पावसाळ्यात लावण्यात आली. आज ही झाडे एक वर्षाची झाली आहेत.
१,२०० झाडांपैकी ५० झाडे वर्षभराच्या कालावधीत मेली आहेत. उर्वरित झाडांची वाढ झाली आहे. अर्धा फूट उंचीची असलेली झाडे आता तीन ते चार फूट उंच झाली आहेत.
चौकट
टॅंकरने पाणी देण्याची व्यवस्था
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई असताना टँकर मागवून देवराई जगली पाहिजे, या हेतूने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि आज त्यांची देवराई एक वर्षाची होत आहे. मेलेली झाडे ते पुन्हा यावर्षी लावणार आहेत. मजूर करून या देवराईची देखभाल केली जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून देवराई उभी करण्याचा ध्यास घेतला आहे.
चौकट
झाडे जगवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
तुम्ही झाडे द्या, लावलेली झाडे जगवण्याची जबाबदारी आमची असा निर्धार निवळी ग्रामस्थांनी गावबैठकीत घेतला आणि विशेष म्हणजे तब्बल वर्षभरानंतर लावलेली झाडे त्यांनी जगवली आहेत. देवराई उभी करण्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली आणि झाडे लावली. नाम फाउंडेशनने झाडे आणि खड्डे मारून दिले तर वर्षभराची झाडाची काळजी वर्गणीतून काढलेल्या पैशातून घेण्यात आली. त्यासाठी सुर्वे हे ग्रामदेवीचे भक्त पुढे सरसावले. त्यामुळे ही देवराई आकार घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.