बीएसएनएल नेटवर्क
हरपुडे गावात गायब
संगमेश्वर ः गेली अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी कंपनीचा टॉवर हरपुडे येथे सुरू झाला. तीन महिन्यांपूर्वी हा टॉवर सुरू झाल्यानंतर येथील नेटवर्कचा प्रश्न सुटणे अपेक्षित होता. फोरजी टॉवर होऊनही त्या गावात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. या विषयी देवरूख आणि रत्नागिरीत तक्रार देऊन देखील अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. ही सेवा येत्या १५ दिवसात सुरळीत न झाल्यास देवरूखमधील बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
------
rat6p16.jpg
68499
मनीषा बागणिकर.
पुणे जिल्हाध्यक्षपदी
मनीषा बागणिकर
साखरपा ः चक्रभेदी या साडवली येथील संस्थेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव-दाभाडे येथील मनीषा बागणिकर यांची निवड करण्यात आली आहे. विधवा आणि एकल महिला तसेच पर्यावरण या विषयांवर चक्रभेदी संस्था विशेष कार्यरत आहे. अशा महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चक्रभेदी प्रयत्नशील आहे. बागणिकर या सिव्हिल इंजिनिअर असून, त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. आजवर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेत चक्रभेदीतर्फे त्यांची निवड पुणे जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा चक्रभेदीच्या संस्थापिका वैदेही सावंत यांनी केली.
-------------
सावंत महाविद्यालयात
वृक्ष लागवड
साखरपा ः येथील प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आबा सावंत यांच्या हस्ते झाला. या वेळी काजू, आंबा, कोकम, चिंच, वड आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वेळी सावंत म्हणाले, झाडे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर हवामानाचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येकाने एकतरी झाड लावावे व त्याची काळजी घ्यावी. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रत्येक विद्यार्थ्याने आज आपापल्या घरी वृक्ष लावून त्याची काळजी घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.