बिग स्टोरी
68969, 68970
rat८p२.jpg, rat८p३.jpg
खेडः लोटे एमआयडीसीतील कंपनीत लागलेली आग.
rat८p८.jpg
69063
कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला आहे.
-----------
इंट्रो
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील रसायननिर्मिती कारखान्यात स्फोट होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. जिल्ह्यातील इतर एमआयडीसींमध्येही किरकोळ घटना घडत असतात. पण लोटेप्रमाणे त्याची तीव्रता तेवढी असतेच असे नाही. स्फोटानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यास सुरवात होते. मात्र, दुर्घटना घडल्यानंतरच त्याविषयी जाग येते. सुरक्षेपासून प्रदूषणापर्यंतच्या अनेक मुद्द्यांबाबत वेळोवेळी सर्वेक्षण होत असल्याचे सांगितले जात असतानाही ही परिस्थिती का ओढवते? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. जिल्ह्यातील रसायन निर्मित कंपन्या म्हणजे केमिकल बॉम्ब असल्यासारखे वाटू लागले आहे.
- मुझफ्फर खान, चिपळूण
------
लोटेतील औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
रासायनिक कंपन्यांमधील अपघात ; पारदर्शकतेचा अभाव, नोटिसा बजावल्या पुढे काय?
लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र सुमारे २ हजार ७३८ एकरमध्ये पसरलेले आहे. त्यात सुमारे ४५७ हून अधिक औद्योगिक भूखंड आहेत. हे औद्योगिक क्षेत्र एमआयडीसीच्या डी गट योजनेच्या श्रेणीत येते. एमआयडीसीची सुमारे पंधरा हजार कोटीची उलाढाल आहे. यूएसव्ही लि., कान्साई नेरोलॅक पेंट्स, घरडा केमिकल्स, डाऊ केमिकल, पेंटोकी ऑर्गेनी (इंडिया), भावना पेट्रोकेम, पार्को फार्मास्युटिकल अँड केमिकल्स, इंडियन ऑक्सलेट, एल्टेक फाइन केम, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, पुष्कर केमिकल, लक्ष्मी ऑर्गानिक, एक्सेल, कृष्णा अँटिऑक्साइड या कंपन्यांचे एमआयडीसीच्या उलाढालीत योगदान मोठे आहे.
पाच वर्षांतील अपघात
लोटे औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यांत गेल्या पाच वर्षांत लहान-मोठे ८९ अपघात झाले आहेत, त्यामध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. १८ गंभीर जखमी झाले आहेत. २१ कामगारांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
एमआयडीसीमध्ये स्फोट का होतात ?
लोटे एमआयडीसीमध्ये बहुतांशी कंपन्या रासायनिक आणि औषधनिर्मिती करणाऱ्या आहेत. या कंपन्यांमध्ये स्फोट होण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथे विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया चालतात. या प्रक्रियेत वापरले जाणारे पदार्थ, उपकरणे आणि प्रक्रिया धोकादायक असते. ज्या कंपन्यांमध्ये रासायनिक पदार्थ बनवले जाते किंवा रसायनावर प्रक्रिया होते. त्या प्रक्रियेत धोकादायक वायू, स्फोटक पदार्थ किंवा ज्वलनशील पदार्थ वापरले जातात, ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते.
----
दृष्टिक्षेपात...
* रासायनिक उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळणे गरजेचे असते. परंतु आतापर्यंत जे स्फोट झाले, त्यामध्ये व्यवस्थापनाने सुरक्षेचे नियम पाळले गेले नसल्याचा आरोप होत आहे.
* कंपन्यांत विविध उत्पादने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियांमध्येही स्फोट होतात.
* बॉयलरमध्ये पाणी गरम करताना स्फोट होतात.
* धातू वितळवताना स्फोट होतात.
* काही वेळा अपघातामुळे स्फोट होतात.
* कंपन्यातील उपकरणे खराब होतात, गॅस लिकेज होतो त्यामुळे रेक्टर मध्ये स्फोट होतो.
----
लोटे एमआयडीसीत झालेले काही अपघात...
* ऑक्विला ऑरॉनिक कंपनीमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
* स्पॉक अग्रोकेम लिमिटेड कंपनीतील अपघातात एका कामगाराचा अपघाती मृत्यू
* डिवाईन केमिकल कंपनीत भीषण स्फोट, पाच कामगार होरपळले
* लासा सुपरजिनेरिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक
* श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रा. लि. या केमिकल कंपनीतील आगीमुळे १० ते १२ स्फोटांमुळे लोटे परिसर हादरून गेला होता.
* श्री पुष्कर केमिकल अॅण्ड फर्टिलायझर्सच्या एक नंबर युनिटमधील इथेनिल ऑक्साईडच्या साठवण टाकीचा स्फोट होऊन टाकीला आग लागली होती.
-----
बंद कारखान्यात घेतले जाते उत्पादन
विकसित झालेल्या लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात किती बेकायदेशीर काम चालते आणि काही कारखाने निष्काळजीने घातक रसायनाचे उत्पादन घेतात, हे अलीकडे झालेल्या अपघातातून आणि स्फोटामधून स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीत २५० लहान, मध्यम व मोठे कारखाने कागदोपत्री दाखवले जात आहेत. यापैकी रासायनिक उत्पादन करणाऱ्या ८० कारखाने आहेत. त्यामध्ये दोन प्रकारचे कारखाने आहेत. घातक रासायनिक उत्पादन करून मोठ्याप्रमाणात प्रदूषण करणारे कारखाने रेड कॅटेगरीत मोडतात. अशा कंपन्या केवळ मोजक्याच आहेत आणि त्या प्रदूषण करतात. त्या कंपन्या ऑरेंज कॅटेगरीत मोडतात आणि ते मध्यम स्वरूपाचे रासायनिक उत्पादन घेतात. विशेष म्हणजे लोटे एमआयडीसीमध्ये काही कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. तरीही या कारखान्यांत काही उत्पादने घेत असल्याचे दिसून येते. पण, कागदोपत्री त्यांचा काहीही उल्लेख नाही.
--------
नियमांची पायमल्ली, कारवाईचा अभाव
रसायन निर्मित कारखान्यांमधील दुर्घटना रोखणे हे सर्वच औद्योगिक वसाहतींपुढील आव्हान असते. तसं ते लोटे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य औद्योगिक वसाहतींपुढे आहे. लोटेत रासायनिक कारखाने अधिक असल्यामुळे तेथील सुरक्षाविषयक प्रश्नांकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक असते. दुर्दैवाने तसे होत नाही. त्यामुळे दरवर्षी आग लागणे, स्फोट होणे अशा घटना घडत आहेत. त्यात कामगारांचा मृत्यू होणे, कामगार जखमी होणे असे प्रकार घडत आहेत. अशा स्फोटाच्या दुर्घटनांनंतर लोकप्रतिनिधी, कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा जागी होते. दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला जातो. सर्व कारखान्यांची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले जातात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तो कारखाना बंद करण्याचे आदेश निघतात. ''सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात येईल'', अशी घोषणा होते. त्यानंतर अपघाताला कारणीभूत असलेल्या कंपनीवर कारवाईचे सोडा अनेक वर्ष उलटून सुद्धा स्फोटाच्या चौकशीचा अहवालही जाहीर होत नाही. मध्यम प्रकारच्या कंपनीत मोठी घटना घडली तर कंपनीचे नाव बदलले जाते. मात्र मालक तोच असतो. यापूर्वी औद्योगिक क्षेत्रात झालेल्या अपघातांमधील मृतांच्या तसेच जखमीच्या नातेवाईकांना संबंधित कंपनी व्यवस्थापनांनी किती आर्थिक मदत केली आहे. याबाबत येथील उद्योजक संघटना, पोलिस यंत्रणा, एमआयडीसी, अग्निशमन दल, कामगार उपायुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहिती नाही.
----------
कारखाना उभारताना भंगार साहित्याचा वापर...
लोटेतील काही उद्योजक आपल्या युनिटचे विस्तार करताना जुनी यंत्रणा वापरतात. कारखाना उभारताना जुन्या साहित्याला रंग लावून ते नवीन असल्यासारखे भासवले जाते. प्रत्यक्षात उत्पादनाच्या वेळेला यंत्रणा साथ देत नाही त्यामुळे अपघात होतात. अशी चर्चा सुरू आहे. कारखान्यांतील बॉयलरमध्ये इंधन म्हणून कोळसा आणि लाकूड वापरले जाते. प्रत्येक कारखान्याच्या बाहेर रस्त्यावर कोळसा किंवा लाकडाचा ढीग असतो. अनेक कारखान्यांचे बॉयलर अक्षरशः रस्त्याला लागून आहेत. अनेक कारखाने असे आहेत जे गेली अनेक वर्षे ‘सीसी’, ‘ओसी’ किंवा अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच सुरू आहेत.
------
(टीप- ही चौकट स्वतंत्रपणे घ्यावी)
कळीचे मुद्दे
* एमपीसीबी गांभिर्यांने तपासणी करतात का ?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी विविध कारखाने आणि कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी करतात. वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि घातक कचरा या तीन पातळ्यांवर ही तपासणी होते. त्यानंतरही कारखान्यांमध्ये स्फोट होतात, त्यामुळे एमपीसीबीचे अधिकारी नक्की तपासणी कसली करतात यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
* अटींची पूर्तता होते का ?
उद्योगांना प्रदूषणानुसार लाल, केशरी आणि हिरव्या अशा तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येते. उद्योगांची विभागणी लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि बृहत् उद्योग अशी केली जाते. त्यामुळे हे उद्योग एकूण नऊ श्रेणींमध्ये विभागले जातात. हरित म्हणजे कमी प्रदूषण, केशरी म्हणजे मध्यम प्रदूषण आणि लाल म्हणजे सर्वांत जास्त प्रदूषण असे हे विभाजन असते. या उद्योगांची त्यांच्या दर्जानुसार तपासणी होते. प्रकल्पाना परवानगी घेताना नोंदवलेल्या अटी पाळल्या जात आहेत की नाही याची एमपीसीबीने तपासणी करणे गरजेचे आहे.
* वर्षातून होणारी तपासणी प्रभावी आहे का ?
लाल श्रेणीमधील बृहत् उद्योगांची महिन्यातून एकदा, तर लाल श्रेणीमधील लघु उद्योगांची सहा महिन्यांतून एकदा तपासणी व्हायला हवी. हरित श्रेणीमधील बृहत् उद्योगांची वर्ष ते दीड वर्षातून एकदा तपासणी होणे गरजेचे आहे. केशरी श्रेणीमधील लघु उद्योगांची वर्ष-दीड वर्षातून एकदा तपासणी होणे अपेक्षित आहे. हरित श्रेणीमधील लघु उद्योगांची दीड ते दोन वर्षांतून एकदा तपासणी केली पाहिजे. यामध्ये तक्रार आल्यास किंवा संमतीपत्र नूतनीकरणाच्या वेळी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचा समावेश असायला हवा. तक्रार आली की ताबडतोब त्या उद्योगांची तपासणी होणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागाचे सर्वेक्षण झाले, कठोर तपासणी झाली तर अपघात आणि स्फोट होण्याचे प्रकार थांबतील.
* दुर्घटनांच्या नोंदी ठेवणे गरजेचे
एखाद्या कंपनीत अपघात झाला तर प्राथमिक उपचार कसे करायचे याचे प्रशिक्षण औद्योगिक सुरक्षा विभाग आणि अग्निशमन दलाकडून कामगारांकडून दिले जाते. तरीही यंत्रणेतील दोषामुळे कारखान्यांमध्ये अपघात होऊन स्फोट होतात. परंतु यंत्रणेतील दोष हा समोर येत नाही त्यामुळे ठपका कोणावर ठेवायचा आणि कारखाण्यामध्ये किती स्फोट झाले, हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही. मोठा स्फोट झाला तरच त्याची चर्चा होते. लहान स्फोट झाला किंवा अपघात झाला तर त्याची नोंद कुठेही सापडत नाही. अपघात किंवा स्फोट रोखणे कामगारांच्या हातात नसते.
------
कामगारांना विमा संरक्षण व उपचाराची सुविधा
लोटे एमआयडीसीतील लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या उपायोजना केल्या जातात. मोठ्या कारखान्यांमध्ये सुरक्षा अधिकारी आहेत. ते कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देतात. कामगारांना कंपनीकडून सुरक्षेच्यादृष्टीने लागणारे सर्व साहित्य आणि उपकरणे पुरवली जातात. कामगारांचा त्यांच्या पगारातून विमा उतरवला जातो. काही वेळा कंपनी स्वःखर्चाने विमा उतरवते. तसेच कंत्राटी कामगारांचाही विमा ठेकेदार उतरवतो. एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर त्याला विम्याची ठरलेली शंभर टक्के रक्कम मिळते. एखाद्या कामगाराला अपघात झाला आणि त्याला विम्याची आर्थिक मदत मिळाली नाही, असे लोटे एमआयडीसीत झालेले नाही. २०१० पूर्वी ज्या कंपन्या बंद पडल्या कंपनीमधील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न मात्र आजही अनुत्तरीत आहे. तसेच लोटे परिसरातील कंपनीत एखादा अपघात झाला तर घरडा हॉस्पिटलमध्ये कामगारांवर प्राथमिक उपचार केले जाते. ही सुविधा घरडा कंपनीने सर्व कंपन्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
------
चौकट
६७ वेळा कंपन्यांना नोटीस
लोटे परिसरात एखाद्या कंपनीत अपघात झाला तर त्याचा चौकशी अहवाल कधीच समोर येत नाही. कारखाना चालला पाहिजे त्यातून रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे या हेतूने संबंधित शासकीय कार्यालय, लोकप्रतिनिधी सोयीनुसार भूमिका घेतात. नुकसानीचा आकडाही लपवला जातो. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्याने कडक भूमिका घेतली तर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला जातो. त्यामुळे कारखानदारांना अटी व शर्ती घालून उत्पादनाची परवानगी दिली जाते. अपघातानंतर काही दिवस बंद असलेले कारखाने पुन्हा सुरू होतात. मागील पाच वर्षात लोटेतील अनेक कंपन्यांमध्ये स्फोट झाले, मात्र एकही कंपनी बंद पडली नाही. मागील पाच वर्षात ६७ वेळा वेगवेगळ्या कंपन्यांना तात्पुरते उत्पादन बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिली होती. संबंधित कंपन्यांकडून पुन्हा अटी-शर्तींचे भंग होणार नाही याची हमी घेऊन त्यांना उत्पादन सुरू करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
------
कोट
rat८p१४.jpg
69060
उदय सामंत
कारखान्यांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत यासाठी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाने विशेष मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. प्रत्येक कारखान्याला त्यांचे पालन करावेच लागेल. त्यांचे पालन औद्योगिक वसाहतीतील कारखाने करतात किंवा नाही, हे तपासण्यासाठी, तसेच त्याबाबत निश्चित अशी देखरेख करण्यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे. लोटे एमआयडीसीमध्ये उद्योजकांची बैठक घेऊन त्या संदर्भातील कडक आदेश दिले आहेत. एमआयडीसीतील औद्योगिक वसाहती अपघातांपासून शंभर टक्के सुरक्षित असाव्यात, असा प्रयत्न आहे.
- उदय सामंत, उद्योग मंत्री
------------
कोट
rat८p११.jpg-
69057
प्रदीप भिलताडे
औद्योगिक सुरक्षा संचालनालयाने कारखान्यातील प्रत्येक घटक, त्या घटकांमुळे असलेला अपघाताचा संभाव्य धोका, प्रत्येक वस्तूची आगीपासून सुरक्षा कशी करावी आदींबाबत खूप विस्तृत अशी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यांचे पालन औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, कारखाने करतात किंवा नाही याची आता आम्ही तपासणी करतो. सर्व कंपन्या शंभर टक्के तत्त्वांचे वर्णन करतात असे नाही, ज्या त्रुटी राहतात त्या आम्ही पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो.
- प्रदीप भिलताडे, निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा विभाग, रत्नागिरी
-------
rat८p१०.jpg-
69056
यशवंत नलावडे
लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीत कोणताही अपघात झाला तर तात्काळ घटनास्थळी पोचणारी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे कारखानदारांना गरजेच्या वेळी आग विझवण्यासाठी या यंत्रणेचा मोठा फायदा होतो. अग्निशमन दलात पाच वाहने आणि १५ जवान आहे. ते २४ तास सेवा देत असतात.
- यशवंत नलावडे, अग्निशमन अधिकारी, लोटे एमआयडीसी
--------
कोट
rat८p१२.jpg-
69058
रामकृष्ण कुलकर्णी
घरडा कंपनीतील कामगारांचा आम्ही विमा काढतो. त्याचे पैसे आम्ही कामगारांकडून घेत नाही. त्यामुळे आमच्या कंपनीत एखादा अपघात होऊन कामगार जखमी झाला तरी त्याला पुरेशी नुकसान भरपाई मिळते. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्व उपाययोजना करत असतो.
- रामकृष्ण कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख, घरडा
-------
कोट
rat८p१३.jpg-
69059
अजिंक्य आंब्रे
औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असलेल्या कारखानदारांनी कामगारांच्या जीवाशी खेळू नये, हे आम्ही त्यांना सातत्याने सांगत आहोत. कारखाना चालला पाहिजे त्यातून रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे तरच एमआयडीसी टिकेल हे सत्य असले तरीही कामगार राहिले तरच कंपनी राहणार आहे. याचा कारखानदारांनी विचार केला पाहिजे.
- अजिंक्य आंब्रे, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आवाशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.