69345
आगामी काळात पक्षाची ताकद वाढविणार
नीलेश राणे ः शिंदे शिवसेनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी साईल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार नीलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली असून, यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख तालुका व शहर प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेची जुनी कार्यकारणी रद्द झाल्यानंतर नूतन कार्यकारणी निवडली आहे. यासंदर्भात आमदार राणे यांनी येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, दादा साईल, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘शिवसेना पक्षाची वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वीपासून हा जिल्हा शिवसेनेचा होता. या जिल्ह्यामध्ये सध्या दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि ठाकरे शिवसेना व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्ष वाढत आहे. कोणाच्या टीकेकडे लक्ष न देता आम्ही कामावर लक्ष दिले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकारणी निर्माण केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल, तरी आपली तयारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहोत.’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः शालेय आरोग्य आणि विजेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. केवळ कोणतीही गोष्ट दिखाऊ न करता सर्वांना यामध्ये अधिक चांगली सेवा कशी देता येईल? या दृष्टिकोनातून काम करू. दरम्यानच्या काळात या महत्त्वाच्या प्रश्नाकडे निधी आला नाही तो माझ्यासह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण भागात शिवसेना अधिक बलाढ्य कशी होईल? या दृष्टिकोनातून काम चालू असेल. बूथप्रमुख, शाखाप्रमुख लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-------------
नवीन कार्यकारणी अशी...
जिल्हाप्रमुख सामंत यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर (कुडाळ), महेश राणे (मालवण), महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, ओरोस मंडळ अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, मालवण मंडळ अध्यक्ष राजा गावडे, मालवण मंडळ अध्यक्ष विनायक बाईत, कुडाळ शहरप्रमुख ओंकार तेली, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, मालवण उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.