कोकण

राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत डॉ. हजिरनीस संघाला विजेतेपद

CD

-rat९p९.jpg-
२५N६९३३१
रत्नागिरी : राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे विजेतेपद डॉ. हजिरनीस संघातील आर. श्रीधरन, पी. हेगडे, आर. गुळवणी, बी. जी. दक्षिणदास यांना प्रदान करताना अध्यक्ष मोहन दामले.
----
डॉ. हजिरनीस संघाला विजेतेपद
राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा ; विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. या स्पर्धेत गोल्डन ग्रुपमध्ये डॉ. हजिरनीस यांच्या टीमने विजेतेपद पटकावले तर सिल्व्हर ग्रुपमध्ये बोरिवली स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद मिळवले.
साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉलमध्ये दोन दिवस या स्पर्धा झाल्या. गोल्डन ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक डॉ. हजिरनीस यांच्या संघाने मिळवला. द्वितीय हेमंत पांडे व सहकाऱ्यांच्या डॅझन संघाने, तृतीय अनिरूद्ध संझगिरी यांच्या फ्रेनमेस, चौथा वरसले यांच्या जाम संघाने, पाचवा क्रमांक जे. के. भोसले यांच्या अमनोरा संघाने आणि सहावा क्रमांक रत्नागिरीच्या मोहन दामले, अभय पटवर्धन, माधव आगाशे व अभय लेले यांच्या श्री मॅंगो संघाने मिळवला. सिल्व्हर ग्रुपमध्ये एस. बी. खानोलकर यांच्या बोरिवली स्पोर्ट्स क्लबने प्रथम, द्वितीय संजय वैद्य यांच्या गणेश (सांगली) संघाने, तृतीय क्रमांक देशमुख यांच्या पल्स ग्रुपने मिळवला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना पन्नास हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेकरिता भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे बहुमोल सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वितेसाठी रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, स्पर्धा कमिटीतील अभय लेले, चिंतामणी दामले, सचिन मुळे, विनायक मुळे यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जीवघेणा क्षण! पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवासी, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Latest Marathi News Updates : ग्रेटर न्यूयॉर्क परिसरात ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Pune News : प्रश्नांच्या पाठपुराव्याचा निर्धार, ‘सकाळ’तर्फे आमदारांची बैठक; अधिवेशनातील कामकाजावर चर्चा

'पश्चिम बंगालमध्ये तब्बल 1 कोटी बनावट मतदार, रोहिंग्या-बांगलादेशी मतदारांची नावे यादीतून काढून टाका'; SIR वरुन वादंग

Sunday Breakfast Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ज्वारी आणि दुधी भोपळ्याचे अप्पे, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT