कोकण

सुरेल गाणाऱ्या तारांनी रसिक मंत्रमुग्ध

CD

-rat९p२१.jpg -
P२५N६९३५३
रत्नागिरी : ‘गाती सुरेल तारा’ कार्यक्रमात व्हायोलिन वादन करताना उदय गोखले. संगीतसाथीला शैलेश गोवेकर, किरण ठाणेदार, सचिन भावे, विनय चेऊलकर, राजू किल्लेकर, गणेश साळोखे आणि निवेदक निबंध कानिटकर.
------------
सुरेल गाणाऱ्या तारांनी रसिक मंत्रमुग्ध
‘अनबॉक्स’चा वर्धापनदिन; ‘गाती सुरेल तारा’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : भक्तीगीते, भावगीते, चित्रपट गीते अशा विविध गीतप्रकारातील सुमधूर गीतांतील शब्दन् शब्द व्हायोलिनच्या तारांमधून बाहेर पडले आणि त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. येथील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक उदय गोखले यांच्या ‘गाती सुरेल तारा’ या कार्यक्रमाने रसिक वि. दा. सावरकर नाट्यगृहात स्वरचिंब भिजले. निमित्त होते ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या अॅपच्या पाचव्या वर्धापनदिनाचे.
रत्नागिरीतील तरुण उद्योजक गौरांग आगाशे यांनी खवय्यांची गरज ओळखून २०२० मध्ये खाद्यपदार्थ पुरवणारे ‘अनबॉक्स युअर डिझायर’ हे अॅप सुरू केले आणि ते अल्पावधीतच लोकप्रिय ठरले. या उद्योगाला जोडून अनबॉक्स फार्मा, ई-स्टोअर, अनबॉक्स सर्व्हिसेस यांच्यासारख्या उद्योगांबरोबरच सामाजिक बांधिलकीतून शहरातील कचरा, टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जुने कपडे आदी गोळा करून कचरामुक्तीचा संदेशही दिला आहे. या अॅपने नुकतेच सहाव्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने गोखले प्रस्तूत गाती सुरेल तारा हा व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गोखले यांनी तू सुखकर्ता, निघालो घेऊनी दत्ताची पालखी आणि खेळ मांडियेला या भक्तिगीतांच्या मेडलीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर तिन्ही लोक आनंदाने, रूणूझुणू रूणूझुणू रे भ्रमरा, कानडा ओ विठ्ठलू, श्रावणात घननिळा, ओ सजना बरखा बहार आई, नीज माझ्या नंदलाला, तोच चंद्रमा नभात, घनरानी, मालिकांची शीर्षक गीते, जेव्हा तुझ्या बटांना, नभ उतरू आले, चांदण्यात फिरताना, असा बेभान हा वारा अशी वैविध्यपूर्ण बहारदार गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ने मजसी ने परत मातृभूमीला या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
गोखले यांना शैलेश गोवेकर (बेस गिटार), गणेश साळोखे (अकॉस्टिक गिटार), सचिन भावे (तबला), किरण ठाणेदार (हॅन्डसोनिक), विनय चेऊलकर आणि राजू किल्लेकर (कीबोर्ड) यांनी संगीतसाथ केली. निबंध कानिटकर यांनी सुसंवादकाची भूमिका बजावली. एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांनी उत्तम ध्वनीसंयोजन केले. कार्यक्रमादरम्यान ''अनबॉक्स'' ग्राहकांचा सन्मानचिन्ह देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. चौकट
दोन कप चहा
एक ज्येष्ठ ग्राहक घरी एकटेच राहतात. मुलं, सुना, नातवंडं परदेशात असतात. तरीही ''अनबॉक्स'' अॅपवरून अनेकदा फक्त २ चहाची ऑर्डर करायचे आणि डिलिव्हरी बॉयला त्यातील एक चहा प्यायला देतात. ''मी घरी एकटाच राहतो. मग मला चहाला कंपनी नको का, तूही चहा पी,'' असा आपुलकीचा आग्रह धरतात. डिलिव्हरी बॉयही त्यांच्या या आग्रहाला मान देऊन चहा घेतो. व्यवसायासोबतच ''अनबॉक्स''ची कौटुंबिक बांधिलकी जपणारी एक आठवण या वेळी सांगण्यात आली.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

Video Viral: रनआऊट होताच रागात बॅट फेकली अन् आपल्याच टीममेटवरही भडकला, पाकिस्तानी खेळाडूचा उद्दामपणा

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT