कोकण

कळंबणी रुग्णालयातील २६ परिचारिकांचा सन्मान

CD

- rat११p१.jpg-
२५N६९७९३
खेड -कळंबणी रुग्णालयातील परिचारिकांचा जेसीआयकडून सन्मान करताना जेसीआयचे पदाधिकारी.
---
‘कळंबणी’तील २६ परिचारिकांचा सन्मान
जेसीआयचा उपक्रम; उल्लेखनीय कामाबद्दल गौरव
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : जेसीआय खेडतर्फे सॅल्यूट टू सायलेंट स्टार या उपक्रमांतर्गत कळंबणी रुग्णालयातील २७ परिचारिकांचा गौरव करण्यात आला. रुग्णसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती जेसीआयचे अध्यक्ष अमर दळवी यांनी दिले.
परिचारिकांच्या गौरव कार्यक्रमावेळी दळवी यांनी जेसीआयच्या कार्यपद्धतीची आणि या उपक्रमामागील उद्दिष्टांची माहिती दिली. तसेच समाजातील दुर्लक्षित; पण महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी माजी अध्यक्ष जेसी आनंद कोळेकर यांनी कोविड काळातील परिचारिकांच्या धाडसी व निःस्वार्थ सेवेस विशेषतः गौरव करण्यात आला. जेसीआय अलुमनी क्लबचे अध्यक्ष जेसी परमानंद बेंडखळे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कपिल कोळेकर यांनी तर उत्तम नियोजन कार्यक्रम प्रमुख जेसी डॉ. दिग्विजय पवार यांनी केले. या वेळी माजी अध्यक्ष जेसी अमित कदम, जेसी दीपक नलावडे, उपाध्यक्ष जेसी रोहित ओतारी, जेसी दानिश पाटणे तसेच खजिनदार जेसी चैतन्य सकपाळ उपस्थित होते. रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी जेसीआय खेडचे आभार मानले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना व सभासदांसाठी अल्पोपाहार व्यवस्था कार्यक्रम प्रमुख जेसी डॉ. दिग्विजय पवार यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT