- ratchl१०२.jpg ः
२५N६९७३५
चिपळूण ः मनोगत व्यक्त करताना विनोद झगडे. शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आदी
------------
ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख
विनोद झगडे शिंदे गटात दाखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे अखेर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. झगडे यांनी शक्तीप्रदर्शन करत ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला.
ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख झगडे यांनी काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजीनाम्याचा ठाकरे सेनेवर कोणताही फरक पडणार नसल्याचे सांगितले होते. ग्रामीण भागातील लोक आणि कार्यकर्ते ठाकरे गटासोबत असल्याचे सांगितले होते; मात्र झगडे यांनी आपल्या समर्थकांची जुळवाजुळव करत ठाकरे सेनेला धक्का दिला. ५०हून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदे यांनी झगडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे स्वागत करून सर्वांचा मानसन्मान राखण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.