कोकण

महामार्गांसह घाटमार्गावर हवा तिसर्‍या डोळ्याचा वॉच

CD

- rat११p१८.jpg -
P२५N६९८४२
राजापूर ः जवाहरचौकामध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही.
---
महामार्गांसह घाटमार्गावर हवी तिसऱ्या‍ डोळ्याची नजर
राजापूर तालुका; चोऱ्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांकडून मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः पोलिस प्रशासनाच्या ‘नेत्रा’ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत बँका, सरकारी व खासगी कार्यालय परिसरात ६० ठिकाणी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरीही शहरातील चोरी अन् घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीचा वॉच अपुरा ठरत आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याच्या सुरक्षिततेचे कवच अधिक मजबूत करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सागरी महामार्ग, घाटमार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आदी मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ‘तिसरा डोळा’ म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्‍याचे जाळे बसवण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सुरक्षितता आणि चोऱ्यांना आळा घालणे, अवैध धंद्यांना पायबंद घालणे यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने नेत्रा उपक्रम राबवला आहे. त्या अंतर्गत पोलिस प्रशासनाने सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले होते. त्याला सरकारी, खासगी कार्यालये, बँका यांच्याकडून प्रतिसादही मिळाला. तालुक्यात १७० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; मात्र गेल्या काही महिन्यात तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत महामार्ग वा अन्य ठिकाणी बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्‍यांमध्ये पोलिस तपासाच्यादृष्टीने अधिक सुस्पष्टता नाही. त्यामुळे विशेषतः सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास त्याचा त्याला अधिक फायदा होणार आहे.

इथेही सीसीटीव्ही आवश्यक
मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथील पाचलफाटा, राजापूरचा डेपो परिसर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार अन् राजापूरची हद्द, मोसम-केळवलीकडे जाणारा रस्ता, अणुस्कुरा घाटमार्ग, पश्‍चिम भागातून जाणारा सागरी महामार्ग या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर अधिकाधिक फायदा होणार आहे.
------
कोट
सुरक्षिततेसाठी सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका, व्यापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सुरक्षितता अधिक मजबूत व्हावी या दृष्टीने वर्दळीच्या ठिकाणी आणखीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहेत. चिपळूणच्या धर्तीवर राजापुरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी मिळावा म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हा नियोजन अन् शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे तसेच बंद घरमालकांनीही आपापल्या घरांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले तर त्याचाही फायदा होईल.

- अमित यादव, पोलिस निरीक्षक
---
दृष्टिक्षेपात
* नेत्रा उपक्रमाला राजापुरात प्रतिसाद
* राजापूर शहरात ६० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
* सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी अनुचित प्रकारांवर वॉच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT