कोकण

रत्नागिरीत सलग चौथ्या वर्षी निघणार आषाढीवारी

CD

rat११p२९.jpg-
२५N६९९१५
रत्नागिरी : आषाढवारीच्या फलकाचे अनावरण करताना अॅड. रूची महाजनी, अॅड. अमित काटे, नंदू चव्हाण आणि पदाधिकारी.
---
रत्नागिरीत सलग चौथ्या वर्षी निघणार आषाढीवारी
मारूती मंदिरतर्फे आयोजन; ६ जुलैला होणार सुरुवात, फलकाचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : येथे सलग चौथ्या वर्षी शक्तीमंदिर ते भक्तीमंदिर या संकल्पनेवर आधारित आषाढीवारी निघणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे ६ जुलैला सकाळी ६.३० वाजता मारूती मंदिर येथून वारीला सुरुवात होईल. मारूती मंदिरतर्फे याचे आयोजन केले आहे. या वारीच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
मारूती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे हा कार्यक्रम झाला तसेच नियोजनाची बैठकही झाली. या वेळी रूची महाजनी, केवल सप्रे, नंदू चव्हाण, विराज चव्हाण, अॅड. अतुल नवरे, राधा चव्हाण, सुहास ठाकूरदेसाई, वैभव पांचाळ, जयदीप साळवी, अॅड. अमित काटे आदी उपस्थित होते. आषाढीच्या दिवशी शहरातील मारूती मंदिरपासून माळनाका, एसटी स्टॅंडमार्गे, रामआळीतून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात वारी पोहोचणार आहे. पारंपरिक वेशभूषेत टाळमृदंग घेऊन आणि तुळशीवृंदावन डोईवर घेऊन वारकरी वारीत सहभागी होणार आहेत. अनेक वर्षे विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या; परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढीवारीचे आयोजन करण्यात येत आहे.
वारीमध्ये अभंग, नामजप, नित्यपाठ, विठूनामाचा जयजयकार करत ही वारी निघणार आहे. वारकरी, भाविकांनी पारंपरिक वेशात, टाळ-मृदुंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आषाढीवारी आयोजकांनी केले आहे.

चौकट १
बळ देणारी वारी
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत विठू माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी. आषाढी एकादशी आली की, वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. या वारीला जवळपास ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदातरी वारी घडावी, अशी माणसाची मनोमन इच्छा असते. प्रापंचिक समस्या, व्यावहारिक अडचणी, शारीरिक मर्यादा यामुळे वारीला जाणं होत नाही. त्यामुळे मनातली वारीची ओढ कमी होत नाही. असे अनेक वारकरी रत्नागिरीतल्या वारीत सहभागी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT