कोकण

५८९ विद्यार्थ्यांचे अर्ज- क्षीरसागर

CD

पुरवणी परीक्षेसाठी ५८९ अर्ज
राजेश क्षीरसागर ः दहावी, बारावीची प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : पुरवणी परीक्षेसाठी शाळामार्फत परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोकण विभागीय मंडळाअंतर्गत दहावीसाठी १९२ आणि बारावीसाठी ३९७ असे ५८९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अतिविलंब शुल्कासह पुनर्परीक्षार्थींना अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर व कोकण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध देण्यात येणार आहे. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उद्या (ता. १२) अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण असल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. प्रवेशपत्राची प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये तसेच प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. २४ जूनपासून सुरू होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळात दहावीसाठी २ हजार ३७७ आणि बारावीसाठी ४ हजार ८२२ असे एकूण ७ हजार १९९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT