कोकण

खेड -दोन दशकांनी उघडणार खेडच्या नाट्यगृहाचा पडदा

CD

rat13p11.jpg
N70322
स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाची इमारत.

दोन दशकांनी उघडणार खेडच्या नाट्यगृहाचा पडदा
केंद्र बनले वातानुकूलित आणि जागतिक दर्जाचे; मंत्री योगेश कदमांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : शहरातील स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल वीस वर्षांनी रसिक प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. एकेकाळी ज्येष्ठ रंगकर्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे सांस्कृतिक केंद्र प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे दोन दशके बंद अवस्थेत होते; मात्र आता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, हे केंद्र पुन्हा एकदा कलारसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. म्हणजे नाट्यगृहाचा लवकरच पडदा उघडणार आहे.
सांस्कृतिक केंद्राच्या कामाची शिवसेना नेते रामदास कदम व मंत्री योगेश कदम यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गेल्या काही वर्षांत सुमारे पंधरा कोटींपेक्षा जास्त निधी खर्चून या केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्णतः वातानुकूलित असे हे केंद्र आता जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावेळी उद्योजक बशीर हजबानी, शिवसेना उपनेते संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, वरिष्ठ लिपिक नागेश बोंडले उपस्थित होते. या केंद्राची स्थापना शिवसेना सत्तेवर असताना रामदास कदम यांच्या पुढाकाराने झाली होती.
शिवसैनिकांच्या माँसाहेब स्व. मिनाताई ठाकरे यांच्या नावाने उभारलेले हे भव्य केंद्र पुढे राजकीय गोंधळामुळे दुर्लक्षित राहिले; मात्र आता शिवसेनेच्या (शिंदे गट) पुढाकाराने हे केंद्र पुन्हा उभारी घेत आहे. खेड आणि संपूर्ण कोकणातील कलारसिकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक असून, लवकरच या नव्या रूपातील सांस्कृतिक केंद्रात नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले जाणार आहे. यामुळे नाट्यरसिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट
कलाविश्वात आनंदाचे वातावरण
हे केंद्र खुलं होत असल्याने स्थानिक कलाकारांना सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होईल. अनेक उपक्रम, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे पुन्हा रंगत येईल. कलाविश्वात यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया आर्ट सोसायटी खेडचे अध्यक्ष आणि कलाकार विनय माळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गणरायाच्या आगमनासाठी 'हे' 3 दिवस मुंबईत वाहतूक बदल, अनेक मार्गावर प्रवेश बंदी; वाचा सविस्तर

Pune News : वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या गाडीला मद्यधुंद कार चालकाची धडक; मद्यधुंद अवस्थेत असलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT