rat१३p१४.jpg-
२५N७०३३१
ओळी ः गणेशगुळे येथील मूर्तिकार ज्ञानेश कोटकर यांच्या अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या गणेशमूर्ती.
---
गणेशगुळेतील पर्यावरणपूरक ४४ गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना
मूर्तिकार ज्ञानेश, नेहल कोटकर यांची संकल्पना; कागदी लगद्याचा वापर, जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मागणी
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या आहेत. ग्राहकांची मागणी आणि व्यवसायवृद्धीसाठी ४० वर्षापूर्वी वडिलोपार्जित परंपरा गुळे येथील श्री गणपती कलाकेंद्राने जपली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार ज्ञानेश कोटकर व नेहल कोटकर यांनी ही किमया केली आहे. त्यांच्या या चित्रशाळेतील ४४ सुबक गणेशमूर्ती नुकत्याच अमेरिकेला रवाना झाल्या.
वडिलोपार्जित चित्रशाळेत ज्ञानेश व नेहल कोटकर यांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे ही संकल्पाना राबवली. हलक्या आणि पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती लोकांपर्यंत पोहचाव्यात, हाच उद्देश होता. या व्यवसायात ज्ञानेश यांची पत्नी नेहल यांचे मोठे सहकार्य असते; मात्र या मूर्ती तयार करताना मनुष्यबळही तितकेच महत्त्वाचे होते; पण यावरही मात करून आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्य मित्रपरिवाराने सहकार्य केले. गणेशगुळेसारख्या ग्रामीण भागातील कारागिरांसाठी रोजगार निर्मिती झाली. ४०० ते ५०० सुबक गणेशमूर्ती तयार होतात. वर्षभर येथील कारागिरांना काम मिळाले. पाच ते सहा कामगार चित्रशाळेत वर्षभर काम करतात. यामध्ये महिलांचा समावेश जास्त आहे. गणेशमूर्तीसाठी आणलेला कागद वेचून भिजवायला ठेवावा लागतो. या कागदामध्ये फोटोग्राफीचा डिजिटल कागद नसावा. कागद अथवा पुठ्ठा दोन ते तीन दिवस पाण्यात कुजवून घेतल्यानंतर मिक्सर ग्राईंडरवर कागद आणि शाडूची माती असे माध्यम वापरून श्रीगणेश मूर्तीच्या विविध रुपातील सुबक मूर्ती साच्यातून तयार करण्यात येतात. या व्यवसायाला जिल्हा व परजिल्ह्यातूनही मागणी वाढली आहे. मूर्ती नेण्यास किफायतशीर हलक्या असल्याने श्री गणेशभक्तांचा कलही वाढला आहे. ४४ गणेशमूर्ती २ जूनला अमेरिकेत पाठवण्यात आल्या. यावर्षी श्री गणपती कलाकेंद्रातून गुहागर-५०, जैतापूर-५०, लांजा-८० पाठवण्यात आल्या; मात्र ३५० गणेशमूर्ती मुंबईला पाठवण्यात येणार असून, या मूर्ती जुलैमध्ये मुंबईत रवाना होणार आहेत तसेच गणेशगुळे येथील स्थानिक गणेशभक्तांच्या शाडू व लगद्याच्या १०१ गणपतीचे काम सुरू असल्याचे नेहल कोटकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले
----------
...बाप्पांचा अमेरिका प्रवास
अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती तालुक्यातील गणेशगुळे येथून टेंपोने रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा (इंदिरा गोदी) येथे पाठवण्यात आल्या. त्यासाठी पुठ्ठ्याचे बॉक्स, भाताची पेंडी व त्यामध्ये श्री गणेशमूर्ती असा दोन फुटाचा बॉक्स तयार करून त्यावर लेबल लावण्यात आले. सुव्यवस्थित गणेशमूर्ती पॅकिंग मूर्ती टेंपो भरून मुंबईत जातात. तेथून विमानाने या ४४ गणेशमूर्ती अमेरिकेला-युएसएला पाठवण्यात आल्या.
कोट...
परजिल्ह्यात आणि अमेरिकेसारख्या देशात माझ्या गणेशमूर्तींना मागणी व्हावी यासारखा आनंदाचा क्षण नाही. ऑगस्टला गणेशमूर्ती विक्रीसाठी पोहोचणार असून, मागणीही वाढली आहे. युएसएला सुबक मूर्ती जाण्याने आणि आपले कौशल्य सर्वदूर गेल्याचे समाधान आहे.
- ज्ञानेश, नेहल कोटकर, मूर्तिकार
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.