कोकण

श्रीमद्भगवद्गीता परीक्षेत मीरा नाटेकर प्रथम

CD

- rat१६p१२.jpg-
२५N७०९०४
शृंगेरी : श्रीमद्भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीरा नाटेकर यांना पारितोषिक देताना श्री शंकराचार्य.

शृंगेरी येथील श्रीमद्भगवद्गीता परीक्षेत मीरा नाटेकर प्रथम
शारदापिठात आयोजन; अश्विनी जोशी उत्तीर्ण, देशभरातील स्पर्धक सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : शृंगेरी येथील शारदापीठ येथे संपूर्ण सातशे श्लोकांची श्रीमद्भगवद्गीता कंठस्थ परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत स्वानंद पठण मंडळाच्या मीरा नाटेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २१ हजाराचे पहिले पारितोषिक मिळाले तसेच या परीक्षेत स्वानंद मंडळाच्या अश्विनी जोशी या सुद्धा उत्तीर्ण झाल्या आहेत. श्री शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
या परीक्षेसाठी भारत आणि भारताबाहेरूनही साधक येतात. या परीक्षेसाठी वयाची अट नसते. प्रत्येक साधकाची स्वतंत्र परीक्षा घेतली जाते. गीतेतील कोणत्याही श्लोकाची सुरुवात सांगितली जाते आणि तिथून पुढे श्लोकपठण करायला सांगतात, असे उलटसुलट कोणत्याही अध्यायातील कोणत्याही श्लोकांची परीक्षा घेतली जाते. यशस्वी साधकांना श्री शंकराचार्यांच्या हस्ते प्रसाद आणि प्रशस्तिपत्रक दिले जाते.
टिळक आळीमध्ये स्वानंद पठण ग्रुपमध्ये गेली अनेक वर्षे स्तोत्रपठण नाटेकर यांची अनेक संस्कृत स्तोत्रे पाठ आहेत. उत्तम उच्चारण आणि कोणत्याही श्लोकापासून सुरवात केल्यावर त्या अध्यायातले पुढचे सगळे श्लोक सुस्पष्ट म्हणण्याची त्यांची तयारी हे बघून शृंगेरी मठ येथे त्यांचे कौतुक केले. नारायणी पठण मंडळाच्या विशाखा भिडे यांच्याकडे त्या सप्तशती शिकल्या. त्याचे पण शेकडो पाठ त्यांनी केले आहेत. त्याबद्दल नारायणी पठण मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी शृंगेरी मठातर्फे गीतापठणात योजना घाणेकर यांना २१ हजारांचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच उज्ज्वला पटवर्धन यांना १८ हजार आणि वंदना घैसास यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: रक्षाबंधनापूर्वी आरबीआय गिफ्ट देणार? मोठी घोषणा करण्याची शक्यता, व्याजदरावर महत्त्वाची अपडेट समोर

VIDEO : 'गंगामाई घरी आली, जय गंगा मैय्या', गंगेच्या पुराचं पाणी घरात शिरलं, पोलीस अधिकाऱ्यानं दूध, फुलं केली अर्पण

Jayakumar Gore; मुंबईचे विमान ऑगस्ट अखेरपर्यंत: पालकमंत्री जयकुमार गोरे: प्रमुख नेत्यांच्या प्रवेशावर माेठं विधान..

Mumbai News : ट्रेनच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, विरारमधील घटना....नेमकं काय घडलं?

Solapur News: 'सव्वातीन लाख ग्राहकांची वीजबिले ऑनलाइन'; साेलापूर जिल्ह्यातील ग्राहकांची वाढतेय पसंती, सवलत योजनांचाही परिणाम

SCROLL FOR NEXT